NIA Esakal
महाराष्ट्र बातम्या

NIA: महाराष्ट्रासह इतर राज्यात PFI संबधित ठिकाणांवर छापे; मुंबईत विक्रोळीत वाहिद शेखच्या घरी छापा

पीएफआय प्रकरणी एनआयएचे मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी छापे

अंकिता खाणे (Ankita Khane)

उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि महाराष्ट्रात पीएफआय या संघटनेवरती छापे टाकले जात आहेत. मुंबईत विक्रोळी परिसरातही एनआयएने पीएफआय वरती कारवाई केल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात एकूण ३ ते ४ ठिकाणी पीएफआयवरती एनआयएची कारवाई सुरू आहे.

देशभरात एनआयएने सकाळपासून कारवाई सुरू केली आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये ही कारवाई सुरू आहे. पीएफआय संघटनेशी संबधित कारवाई सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून पीएफआयवर कारवाई सुरू केली आहे. अनेकांना अटक केली आहे. त्यासंबधित ही कारवाई सुरू केली आहे.

विक्रोळीमध्ये अब्दुल वाहिद शेख याच्या घरी एनआयएची टीम पोहोचली आहे. २००७मध्ये ट्रेन ब्लास्ट झाले त्यामध्ये त्याला अटक करण्यात आली, मात्र २०१५ मध्ये त्याला न्यायालयाने सर्व दोषापासून मुक्त केले त्यामुळे तो बाहेर होता. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी त्याच्या घरी एनआयएची टीम पोहोचली.

अब्दुल वाहिद शेखचा दावा आहे की, पोलिसांचे पथक छापा टाकण्यासाठी पहाटे 5 वाजता त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. दरवाजा न उघडल्याने एनआयए च्या पथकाने तोडला दरवाजा तर नोटीस न दाखवल्याने दरवाजा न उघडल्याचा दावा कुटुंबाने केला आहे.

वाहिद शेख सामाजिक कार्यकर्ता असून ज्याला बॉम्बस्फोट प्रकरणात काही वर्ष पूर्वी सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) मदुराई, तामिळनाडू येथील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) शी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT