Video Viral Sakal
महाराष्ट्र बातम्या

Irshalwadi Landslide Video : 36 तासांची मृत्यूशी झुंज अखेर यशस्वी! ढिगाऱ्याखालून महिलेला जिवंत बाहेर काढलं

अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दत्ता लवांडे

Raigad Irshalwadi Landslide Update : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली. यामध्ये आत्तापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा जास्त नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यातच बचाव पथकाकडून एका महिलेला जिवंत बाहेर काढण्यात आलं आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, मुसळधार पाऊस आणि घटनास्थळी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत असून हे काम संथ गतीने सुरू असल्याची माहिती काल उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली होती. तर काल सायंकाळी खराब हवामानामुळे बचावकार्याचं काम थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर आज सकाळी बचावकार्याला पुन्हा सुरूवात करण्यात आली होती.

या घटनेमध्ये अडकलेल्या १०० पेक्षा जास्त नागरिकांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. तर एका महिलेला मातीच्या ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात आलं असून हा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. ही महिला तब्बल ३६ तासांपेक्षा जास्त काळ मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली होती. तिची मृत्यूशी झुंज अखेर यशस्वी ठरली आहे. सध्या तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री ११ च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर काल (गुरूवारी) दिवसभर बचावकार्य सुरू होते. यामध्ये अनेकांना वाचवण्यात आलं आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली असून जखमींवर सरकारकडून उपचार करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT