Irshalwadi Landslide CM Eknath Shinde Video Sakal
महाराष्ट्र बातम्या

Irshalwadi Landslide : रेनकोट घालून पाऊलवाटेने दीड तासाची पायपीट करत मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल | Video Viral

Irshalwadi Landslide News: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.

दत्ता लवांडे

Irshalwadi Landslide News : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा अधिक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. तर घटनेची दाहकता लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थेट रेनकोट घालून दीड तासांची पायपीट करून घटनास्थळी दाखळ झाले आहेत.

मुख्य रस्त्यापासून इर्शाळवाडीपर्यंत जाण्यासाठी अतिशय अवघड पायवाट आहे. तर येथे पोहचण्यासाठी सुमारे दीड तास लागतो. तरीही जनतेला मदत आणि धीर देण्यासाठी त्यांनी घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला असून थेट रेनकोट घालून पाऊलवाटेने कूच केली आहे. त्यांच्यासोबत इतर कर्मचाऱ्यांचा ताफा आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, दरड कोसळण्याची ही घटना रात्री ११ च्या सुमारास घडली. ४८ कुटुंब असलेल्या या गावामध्ये २२८ जण राहत असल्याची माहिती समोर आली असून अजनही अनेकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून अनेक पथके इर्शाळवाडीमध्ये दाखल झाले आहेत.

मुसळधार पाऊस आणि गावात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे बचावकार्यासाठी अडथळा येत आहे. तर छोटा अडीच टन वजनाचा जेसीबी एअरलिफ्ट करता येईल का याची चाचपणी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

Plane Service : मोठी बातमी! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून होणार सुरू; 'डीजीसीए'कडून स्टार एअरला परवानगी

NCP News: सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमात, रोहित पवार भडकले, काय म्हणाले?

Beed News: सरकारी वकिलाचं टोकाचं पाऊल, कुटुंबाच्या मागणीने मोठा ट्विस्ट, बीड हादरलं..

Pune News : ठेकेदारावर पीएमपीने कारवाई केली, महापालिका कधी करणार? मनसेचा महापालिकेला प्रश्‍न

SCROLL FOR NEXT