Irshalwadi Sakal
महाराष्ट्र बातम्या

Irshalwadi Landslide : ती वाचली कुटुंब गमावलं; आश्रम शाळेत शिकणाऱ्या चिमुकलीचा आर्त टाहो

दत्ता लवांडे

रायगड : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १०० पेक्षा जास्त लोकं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. तर बचावपथकाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

यामध्ये अनेकांनी आपले नातेवाईक, कुणी भाऊ, कुणी वडील, कुणी आई, कुणी बहीण गमावली आहे. त्यातच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या अपघातात जयश्री वाघ या चिमुकलीचं अख्खं कुटुंबच या दरडीखाली गाडलं गेलं आहे. यामध्ये तिचे आई, वडील, भाऊ असे सर्वच गाडले असून आता तिच्या कुटुंबातील एकही माणूस शिल्लक राहिलं नाही.

सदर मुलगी ही आश्रम शाळेत शिक्षणासाठी होती म्हणून ती वाचली. मे महिन्यात ती आपल्या कुटुंबियांना भेटली होती. किसन वाघ असं तिच्या वडिलांचं नाव आहे. या मुलीच्या कुटुंबातलं कुणीच राहिलं नाही. तिचा फक्त टाहो आता ऐकायला येत आहे.

दरम्यान, ४८ कुटूंब असलेल्या आणि २२८ लोकसंख्या असलेल्या गावात ही घटना घडली असून प्रशासनातर्फे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. त्याचबरोबर काही जेसीबी हेलिकॉप्टरद्वारे एअरलिफ्ट करता येतील का अशा विचार प्रशासनाकडून सुरू आहे. पण मुसळधार पाऊस आणि रस्ता नसल्यामुळे बचावकार्यास अडथळा येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yoga Day Wishes in Marathi: योग म्हणजे स्वतःशी जोडणारा सर्वात सुंदर संवाद! योग दिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा आणि प्रेरणादायी संदेश!

Arabian Sea Cyclonic Circulation : अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती, २५ जूनपासून पावसाला होणार सुरूवात; १ जुलैपासून मॉन्सून पूर्णपणे सक्रिय

Sindhudurg: दोन दिवसांपूर्वी अभिनेत्रीच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मॉलला टाळं, एफडीएनं केली कारवाई

वैभव सुर्यवंशीला आज शेवटची संधी; जाणून घ्या IND A vs SL A Final कधी, कुठे पाहाल

Omraje Nimbalkar यांची समजूत काढण्याचा प्रयत्न! ऑपरेशन टायगर फेल करण्यासाठी उद्धव ठाकरेंची रात्रीत एक मोठी चाल

SCROLL FOR NEXT