Raigad Schools Closed Due To Rain Esakal
महाराष्ट्र बातम्या

Raigad Schools Closed: राज्याला पावसाचा दणका! पुण्यानंतर 'या' जिल्ह्यातील शाळांनाही जाहीर झाली सुट्टी

Maharashtra Rain: गेल्या काही दिवसांपासून राज्यासह मुंबई, पुणे आणि कोकणातील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.

आशुतोष मसगौंडे

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह मुंबई, पुणे आणि कोकणातील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.

अशात रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सावित्री, कुंडलिका, आंबा नदीने धोका पातळी ओलांडली. तर महाड, रोहा, पाली, नागोठणे येथे पूरस्थिती निर्माण. पाताळगंगा नदीच्या पातळीत मोठी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे.

या पार्श्वभूमीवर रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यानी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

यापूर्वी पुण्यातील शाळा महाविद्यालयांसह विविध अस्थापना आणि कार्यालयांनाही जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सुट्टी जाहीर केली होती. कारण पुणे आणि परिसरात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, जिल्ह्यातील सर्वच धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने नागरी वस्त्यामध्ये पाणी शिरले आहे. यामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर लोकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे.

"मुंबई, पुणे, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे. जिल्हा आणि मनपा प्रशासन सज्ज असून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत, ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगाने सुरु आहे. काळजीचं कारण नाही, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावं असं आवाहन मी करतो," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

अतिवृष्टी होत असलेल्या परिसरात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकात समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: भूमकर पुलावर अपघात, पाच गाड्यांना कंटेनरची धडक

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT