railway News esakal
महाराष्ट्र बातम्या

Railway Breaking: आता फक्त सुपर फास्ट असलेली रेल्वे होणार सुपर डुपर फास्ट; घेतला महत्वाचा निर्णय

Chinmay Jagtap

मध्य रेल्वेने ९५.४४ किमीच्या वर्धा-बडनेरा विभागात रेल्वे रुळांचे विस्तारीकरण, ओव्हरहेड वायर यंत्रणेचे नियमन करणे, सिग्नल आणि अन्य यांत्रिकीकरणासह पायाभूत सुविधा उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सीएसएमटी -हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेससह एकूण ३० गाड्यांना ताशी १३० किमी वेगाने धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या रेल्वे प्रवासाचा वेळेत बचत होणार आहे.

काही महिन्यापूर्वीच मध्य रेल्वेने भुसावळ विभागातील रेल्वे मार्गासह पायभूत सुविधा अद्यावत केल्यामुळे दुरांतो एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस आणि गीतांजली एक्सप्रेससह एकूण ६७ मेल- एक्सप्रेस गाड्यांची गती वाढली आहे. आता मध्य रेल्वेने ९५.४४ किमीच्या वर्धा-बडनेरा विभागात पायभूत सुविधा अद्यावत केल्या आहे.

त्यामुळे वर्धा-बडनेरा विभागात मेल- एक्सप्रेस गाड्या ताशी १३० किमी वेगाने धावणार आहे. मध्य रेल्वेने नुकताच १३० प्रति तास वेगासह स्पीड ट्रायल यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्यामुळे अप आणि डाउन मार्गावरील प्रत्येकी १५-१५ अशा ३० गाड्या वर्धा-बडनेरा ९५.४४ किमी लांबीच्या १३० किमी प्रतितास वेगाने चालविण्यात येत आहेत.

या ३० गाड्यांचा वेग वाढला

सीएसएमटी-हजरत निजामुद्दीन-सीएसएमटी राजधानी एक्सप्रेस, सीएसएमटी-अमरावती-सीएसएमटी,सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी, हावडा-सीएसएमटी-हावडा, सीएसएमटी-गोंदिया-सीएसएमटी, सीएसएमटी-हावडा-सीएसएमटी,एलटीटी--हटिया-एलटीटी,एलटीटी-विशाखापट्टणम-एलटीटी, एलटीटी-पुरी-एलटीटी, एलटीटी-भुवनेश्वर-एलटीटी, सीएसएमटी-हावडा-सीएसएमटी गीतांजली एक्सप्रेस, सीएसएमटी-हावडा-सीएसएमटी,पुणे-संत्रागाची-पुणे ,एलटीटी-कामाख्या-एलटीटी,सीएसएमटी- हावडा-सीएसएमटी दुरांतो एक्सप्रेस,गोंदिया-सीएसएमटी-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस ,नागपूर-सीएसएमटी-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस ,एलटीटी-शालिमार-एलटीटी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस ,एलटीटी-पुरी-एलटीटी,सीएसएमटी-हावडा-सीएसएमटी,एलटीटी- शालिमार-एलटीटी समरसता एक्स्प्रेस.

या विभागात काम सुरु

मध्य रेल्वे सध्या एकूण १२०६.७३ किमी म्हणजे ९५.४४ किमी, इगतपुरी-नाशिक-भुसावळ-अकोला-बडनेरा सेक्शनवर ५२६.६५ किमी, पुणे ७५९ किमी असे एकूण १२०६.७३ किमी अंतर कापून १३० किमी प्रतितास वेगाने गाडया चालवते. तर पुणे -दौंड विभाग आणि इटारसी-नागपूर-वर्धा-बल्लारशाह विभागावर ५०९.०५ किमी. दौंड-सोलापूर-कलबुर्गी-वाडी या ३३७.४४ किमी अंतरावर गाड्यांचा वेग वाढवण्याचे काम सुरू असून या भागावर ताशी १३० किमी वेगाने गाड्या धावण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT