kasara ghat  sakal
महाराष्ट्र बातम्या

Railway: आता कसारा घाटातुन प्रवास होणार सुपर फास्ट; घेतला हा महत्वाचा निर्णय!

सकाळ डिजिटल टीम

Railway: मध्य रेल्वेचा कसारा यार्ड सुधारणा प्रकल्प प्रगतिपथावर असून जवळपास ७८ टक्के काम पूर्ण झाले आहे. यामुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. तसेच कसारा ते इगतपुरीदरम्यान रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

मध्य रेल्वेच्या कसारा आणि कर्जत घाटात दररोज दीडशेपेक्षा जास्त गाड्यांची ये-जा होते. अनेक गाड्यांना घाट विभागात तांत्रिक थांबे दिले जातात. त्यामुळे गाड्यांच्या व्यक्तशीरपणावर मोठा परिणाम होतोय.

तसेच मध्य रेल्वेच्या कसारा यार्डमधील प्लॅटफॉर्मची लांबी-रुंदी मेल-एक्स्प्रेसच्या गाड्यांच्या तुलनेत कमी असल्याने एक गाडी निघेपर्यंत मार्गिकेवर थांववले जात होते. त्यामुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होत होता. तसेच उपनगरीय लोकल सेवांवरही त्याचा परिणाम दिसून येतोय. त्यामुळे रेल्वे गाड्यांचा व्यक्तशीरपणा सुधरवण्यासाठी मध्य रेल्वेने कसारा यार्ड सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे.

या प्रकल्पाचे ७८ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी १९.९९ कोटींचा खर्च केला जाणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पात विविध महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश आहे. डाऊन यार्डवर मार्गिका क्रमांक १, २ आणि ३ रिसेप्शन आणि डिस्पॅच मार्गिकांची लांबी ८४४ मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

फलाट क्रमांक १ आणि २ चे रुंदीकरण आणि विस्तार करण्यात येणार आहे. अप यार्ड मार्गिका क्र ४, ५, ६ रिसेप्शन आणि डिस्पॅच मार्गिकांची लांबी वाढवण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पासाठी रस्ते उड्डाणपूल तोडून पुनर्बांधणी केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT