Maharashtra Rain Update 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Update : पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी गारपीट! पुढील काही तासांत 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता

राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह जोरदार गारपीट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

रोहित कणसे

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह जोरदार गारपीट झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड तर नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचे पावसासह गारपीट झाली. नाशिकच्या ग्रामीण भागात देखील गारपीटीसह पाऊस झाला आहे

पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांशी संयोग होऊन कोकण- गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य प्रदेशचा नैऋत्य भाग आणि गुजरातच्या काही जिल्ह्यांमध्ये २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान काही ठिकाणी दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. २६ तारखेला उत्तर मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचीही शक्यता आहे.

येत्या तीन तासांत पावसाची शक्यता

येत्या तीन तासांत देखील काही ठिकाणी मध्यम पाऊस, तुरळक ठिकाणी गारपिटीसह मुसळधार सरी कोसळण्याची शक्यत वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासोबत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे यासह मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, बीड, जालना तर विदर्भात बुलढाणा, अकोला जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

नाशिकमध्ये पावसाने झोडपले

नाशिक जिल्ह्यातील कसबे, मौजे सुकेने आणि परिसरात बिगर मौसमी पाऊस कोसळत आहे. तर सुकेने परिसरात गारांचा वर्षात झाला. यासह सिन्नर परिसरातदेखील पाऊस कोसळत आहे. आठवडा बाजार असल्यामुळे नागरिकांची धावपळ झाली. सुकेने, सिन्नरसह चांदोरी परिसरामध्येही गारांचा पाऊस कोसळला आहे. अवकाळी कोसळलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT