Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : आज राज्यात मुसळधार! या 27 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून हायअलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Weather Update : राज्याच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, मुंबईसह अनेक भागात पावसाने नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. हा पाऊस मान्सूनचा नसून पूर्व मॉन्सून असल्याचा हवामान खात्याचा दावा आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, मुंबईसह अनेक भागात पावसाने नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. हा पाऊस मान्सूनचा नसून पूर्व मॉन्सून असल्याचा हवामान खात्याचा दावा आहे. तर आजही राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडटांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रासह दक्षिण कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर आज जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्येही हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) प्रवेशद्वारावर महाराष्ट्राच्या असलेल्या गोव्यात दाखल झाले असतानाच महाराष्ट्रावर बुधवारी (ता. ५) वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने मंगळवारी व्यक्त केला. त्यासाठी व महाराष्ट्राला हवामान खात्याने 'येलो अलर्ट' दिला आहे.

मुंबई, मुंबई उपनगर, पालघर,जळगाव, धुळे आणि नंदूरबार हे जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात हवामान खात्याने वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाश यामुळे कमाल तापमानात वेगाने घट होऊ लागली आहे. विदर्भ वगळता बहुतांश महाराष्ट्रात कमाल तापमान ४० अंशांच्या खाली घसरले आहे. राज्यात मंगळवारी जळगाव येथे ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

कोकण : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, हिंगोली.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT