rain esakal
महाराष्ट्र बातम्या

Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात शनिवारी (ता. १३) आणि रविवारी (ता. १४) तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात शनिवारी (ता. १३) आणि रविवारी (ता. १४) तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान राज्यात शुक्रवारी ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा कडाका कमी जाणवला.

सौराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मध्य महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात रविवारी (ता. १४) तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान कोकण-गोव्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले. पुणे आणि परिसरात शनिवार आणि रविवारी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची, तर सोमवारी (ता. १५) हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Hasan Mushrif : 'हसन मुश्रीफ हतबल, महायुतीत आताच डोकीफुटत आहेत'; सतेज पाटील यांची टीका, गोकुळ निवडणुकीवरून राजकारण तापलं

Raju Shetti: १५ ऑक्टोबरला कारखान्यांची धुराडी पेटल्यास संघर्ष; राजू शेट्टींचा इशारा, हुबळीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार

४० पैशांनी जीव जाणार नाही, प्रत्येक गोष्टीवर कर दिला पाहिजे; UPI शुल्कावर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान, सांगितली चाणक्यनीति

Kagal Municipal Council : कागल नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; हसन मुश्रीफ, समरजित घाटगेंच्या कारभारावर सवाल, कर्मचाऱ्यांचा ठिय्या

Gold Rate Today: अमेरिकेच्या एका निर्णयाने सोनं स्वस्त! महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती? सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?

SCROLL FOR NEXT