monsoon sakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon : मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम

गेल्या आठवड्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - उत्तरेकडे मॉन्सून सरकत असताना मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर वाढू लागला आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, नगर, नाशिक जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. राज्यातील एकूण २६ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, हिंगोली व विदर्भातील अकोला, वाशीम, गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

गेल्या आठवड्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. मराठवाड्यातही मागील तीन दिवसांपासून दररोज पाऊस पडत आहे. मात्र, लातूर भागात पावसाचा जोर कमी होता. आता या भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे ओढे, नाले भरून वाहू लागले आहे. पडलेल्या पावसामुळे खरिपाच्या कामांना वेगात सुरुवात झाली आहे.

कोकणात पावसाचा प्रभाव कमी

कोकणात मागील चार ते पाच दिवसांत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. ठाणे जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी होते. या पावसामुळे अनेक ठिकाणी भात खाचरे भरली असून भाताच्या रोपवाटिकांच्या कामांना वेग आला आहे.

मध्य महाराष्ट्रात कमीअधिक पाऊस :

मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाची उघडिप दिली असून काही प्रमाणात ढगाळ वातावरण कायम आहे. नाशिक, सोलापूर, नगर भागात पावसाचा जोर कमी अधिक आहे. खानदेशात ढगाळ वातावरण आहे. नाशिकमध्ये गेल्या बारा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहे. तर पाच दिवसांपासून चांदवड,नांदगांव, इगतपुरी, देवळा, मालेगाव, येवला, सिन्नर, निफाड दमदार पावसाने हजेरी लावली आहे.

मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार :

मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, धाराशिव व परभणी जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत आधीच्या दोन दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर अत्यंत कमी राहिला. बहुतांश मंडलांत पावसाची हजेरी तुरळक हलक्या स्वरूपाची होती.

विदर्भातही जोर

विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांत मॉन्सूनचा प्रभाव वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बसरत आहेत. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Hasan Mushrif : 'हसन मुश्रीफ हतबल, महायुतीत आताच डोकीफुटत आहेत'; सतेज पाटील यांची टीका, गोकुळ निवडणुकीवरून राजकारण तापलं

Raju Shetti: १५ ऑक्टोबरला कारखान्यांची धुराडी पेटल्यास संघर्ष; राजू शेट्टींचा इशारा, हुबळीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार

४० पैशांनी जीव जाणार नाही, प्रत्येक गोष्टीवर कर दिला पाहिजे; UPI शुल्कावर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान, सांगितली चाणक्यनीति

Kagal Municipal Council : कागल नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; हसन मुश्रीफ, समरजित घाटगेंच्या कारभारावर सवाल, कर्मचाऱ्यांचा ठिय्या

Gold Rate Today: अमेरिकेच्या एका निर्णयाने सोनं स्वस्त! महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती? सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?

SCROLL FOR NEXT