Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : राज्यातील या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, अशी असेल राज्यातील पावसाची परिस्थिती

पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय

अंकिता खाणे (Ankita Khane)

मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला आता सुरुवात झाली आहे. मात्र, अद्याप राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने येत्या 24 तासांमध्ये राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोकण किनारपट्टीसह इतर भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात आगामी 24 तासांमध्ये अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांत ठाणे, मुंबई, उपनगरसह राज्यात आजही पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसून येईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुढील 24 तासांत अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या विविध भागात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

5 ऑक्टोबरनंतर आकाश अंशतः ढगाळ राहून हवामान कोरडं राहील. त्यामुळे, पावसाची शक्यता कमी असणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ऑक्टोबर महिन्यात मात्र कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या महिन्यात राज्यातून मान्सूनच्या परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur politics : मतदार यादीतील गोंधळ, सुनावणी पुढे ढकलली… महापालिका निवडणुकीवर अनिश्चिततेचे ढग; इच्छुकांमध्ये चिंता वाढली

Latest Marathi News Live Update: संसद मार्गावरील निषेध प्रकरणातील आंदोलक न्यायालयात हजर

Mumbai News: वाय-फाय, चार्जिंग, कॅफे, सोफा… मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर विमानतळासारखे डिजिटल लाउंज उभारणार, कधी सुरू होणार?

Kolhapur Politics : दिवसा नियोजन, रात्री जोडण्या; चंदगडच्या गल्लीगल्लीत निवडणूक तापवणारी गुप्त राजकीय व्यूहरचना!

SMAT 2025: T20 सामन्यात सुपर ओव्हरचा ड्रामा! अभिषेक शर्मा गोल्डन डकवर बाद, CSK च्या गोलंदाजांनं दोनदा धाडलं माघारी

SCROLL FOR NEXT