rain  sakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार; मुंबई, पुण्यासह किनारपट्टीला अलर्ट

ओमकार वाबळे

ऐन हिवाळ्यात थंडीची चाहूल सुरू झालेली असतानाच राज्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार कर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने राज्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग अधिक असल्याने मच्छिमारांना आज आणि उद्या समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे. तर पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबारसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मात्र, या भागातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टी भागात आज वाऱ्यांचा वेग जास्त असणार आहे. तर उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात उद्या वाऱ्यांची तीव्रता वाढणार आहे.

मागील महिन्यात दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशाला वादळी पावसाचा तडाखा बसला. पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं. यानंतर महाराष्ट्रातही काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबई पुणे, सोलापुरात सरी बरसल्या!

मुंबईत देखील पावसाच्या सरी बरसल्या आहेत. कालपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. सोलापूरातही मंगळवारी पाऊस झाला. तर पुण्यात बुधवारी पहाटेपासून रिपरिप सुरू आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस अनुभवायला मिळतोय. मुंबईतील किमान सरासरी तापमान २३.८ अंश सेल्सिअसवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil Jitendra Awhad Eknath Shinde : जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड रात्रीतून एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंद दाराआड ४५ मिनीटांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

Tamil Nadu CM Vijay: तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा अनोखा निर्णय! जन्मलेल्या प्रत्येक बाळाला मिळणार सोन्याची अंगठी; 'मामा'ची अनोखी भेट

Maharashtra News: मुख्यमंत्र्यांच्या परस्पर भेटीवरून नाराजी? सुनेत्रा पवारांकडून विचारणा; तटकरे यांचा इन्कार

Pune Rain: पुणेकरांना दिलासा! आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन; पुढील २-३ दिवस हलक्या सरींचा अंदाज

Miraj Assembly Constituency : 'मिरज मतदारसंघ खुला झाला तरी मी निवडणूक लढवणारच'; आमदार खाडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, राजकीय समीकरणे बदलणार?

SCROLL FOR NEXT