महाराष्ट्र बातम्या

पुणे, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गला ऑरेंज तर सातारा, रत्नगिरीला रेड अलर्ट

घाटमाथ्यावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच पुणे या जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. महाबळेश्‍वरने चेरापुंजीलाही मागे टाकले आहे.

रज्यातील विविध ठिकाणी पूर परिस्थिती उद्भवत असून, मदत कार्यात एनडीआरएफ आणि लष्करातर्फे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच पुणे, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गला ऑरेंज तर सातारा रत्नगिरीला रेड अलर्ट दिला आहे.

राज्यात शुक्रवारी (ता. २३) मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टी झाली. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर काही भागात पावसाच्या जोरदार सरी पडल्या. त्याचबरोबर मराठवाड्यातही मुसळधार पावसाची नोंद झाली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा घाट विभागात अतिवृष्टीचा तर चंद्रपूर, यवतमाळ, पालघर ठाणे आदी परिसरात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत महाबळेश्‍वर येथे १८० मिलिमीटर इतका पाऊस पडला होता. सध्या राज्यात पावसाच्या जोरदार सरींसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या बुधवारपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडेल. तर महाराष्ट्र किनारपट्टीलगत सोसाट्याचे वारे वाहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT