rain esakal
महाराष्ट्र बातम्या

दीपोत्सवात पावसाची शक्यता; द्राक्ष व कांदा उत्पादकांत चिंता

महेंद्र महाजन

नाशिक : लक्ष्मीपूजनापासून दीपोत्सवातील हर्षोल्हासाला कोरोनाच्या अटकावामुळे उधाण येणार असताना विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांगली, सोलापूर, सातारा, नाशिक, पुणे जिल्ह्यात ७ नोव्हेंबरपर्यंत हे चित्र असण्याची शक्यता हवामानशास्त्र अभ्यासकांनी वर्तवली आहे. त्यामुळे विशेषतः द्राक्ष आणि कांदा उत्पादकांमध्ये काळजीचा सूर उमटू लागला आहे.

नुकसानीला सामोरे जावे लागण्याची भीती

नव्याने लागवड केलेल्या लाल कांद्याचे यापूर्वीच्या पावसाने नुकसान झाले आहे. काही भागात कांद्याच्या रोपांची पुनर्लागवड शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. पावसाच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे यंदा नवीन कांदा बाजारात येण्यासाठी एक ते दीड महिन्यांचा विलंब झाला आहे. अशा परिस्थितीत आता सतत पाऊस सुरु राहिल्यास नवीन लाल कांद्याचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय भाजीपाल्याचे नुकसान ठरलेले आहे. चाळींमध्ये साठवलेल्या उन्हाळ कांद्याला पावसामुळे कोंब येण्याचा वेग वाढणार आहे. त्यामुळे उन्हाळ कांदा उत्पादकांना नुकसानीला सामोरे जावे लागण्याची भीती आहे. याशिवाय ‘अर्ली’ द्राक्षांची काढणी सुरु झाली आहे. अशा भागात पाऊस सुरु राहिल्यास मणी तडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

द्राक्षांचे पावसाने यापूर्वी नुकसान केले आहे. सलग दोन ते तीन दिवस पाऊस झाल्यास फुलोऱ्यात असलेल्या द्राक्ष बागांमधील घडकूज होणार आहे. त्याचवेळी आठ दिवसांमध्ये छाटण्या झालेल्या बागा पोंग्याच्या अवस्थेत पोचत असताना पावसाने घड जिरण्याचे प्रमाण वाढण्याची भीती उत्पादकांना वाटते आहे. यंदा ऑगस्टच्या मध्यापर्यंत फारसा पाऊस न झालेल्या भागातील द्राक्ष बागांना स्वच्छ सूर्यप्रकाश मिळाला असल्याने ‘बंपर' उत्पादनाची चिन्हे दिसू लागली आहेत. पहिल्यांदा धरलेल्या बागांमध्ये चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकऱ्यांना वाटते आहे.

मध्यम पावसाचा अंदाज

* येत्या २४ तासांपासून ७ नोव्हेंबरपर्यंत : सांगली जिल्हा (जत, खानापूर, कवठेमहांकाळ, आटपाडी, तासगाव, वाळवा, पलूस, मिरज), सोलापूर जिल्हा (अक्कलकोट, दक्षिण व उत्तर सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ), सातारा जिल्हा (फलटण, खटाव, पाटण, महाबळेश्‍वर).

* ५ ते ७ नोव्हेंबरपर्यंत : नाशिक (बागलाण, चांदवड, कळवण, येवला, निफाड, लासलगाव, सिन्नर, दिंडोरी), पुणे जिल्हा (बारामती, इंदापूर, बोरी, नारायणगांव, कळंब).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: समुद्र, शॉपिंग आणि मनोरंजनाचा संगम... मुंबईला मिळाले नवे पर्यटनस्थळ; इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल आता सर्वसामान्यांसाठी खुले

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडच्या खिलाडूवृत्तीवर संशय? कर्णधार श्रेयस अय्यर संतापला, दुसऱ्या सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं?

१०० पुरुष, १५ महिलांशी शारीरिक संबंध, रात्रीच्या वेळी दारु पाजायचा अन्...; HIV पॉझिटीव्ह डिलीवरी बॉय निघाला सायको किलर

Career Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांचे नशीब असते बलवत्तर! कोणतीही परीक्षा एका झटक्यात होतात पास, समाजात मिळवतात मोठं स्थान

Latest Marathi News Update : बुलढाण्यात अतिवृष्टीचा तडाखा; शेतरस्ते वाहून, पंचनाम्याचे आदेश

SCROLL FOR NEXT