Weather Alert
Weather Alert Esakal
महाराष्ट्र

Weather Alert : राज्यात येत्या ४८ तासात मुसळधार पाऊस, बळीराजाच्या चिंतेत वाढ

सकाळ डिजिटल टीम

एकीकडे राज्यात थंडीचा कडाका वाढत असतानाच दुसरीकडे राज्यांमध्ये पावसाची संततधार सुरू झाली आहे. राज्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात लक्षणीय बदल दिसून येत आहेत. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण आहे. तर, काही भागात पाऊसाच्या रिमझीम सरी कोसळत आहेत. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ स्थितीमुळे रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली आहे.

तर येत्या 48 तासांमध्ये राज्यातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ थांबल्यानंतर त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झालं आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांसह विदर्भात काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऐन हिवाळ्यात पाऊस पडत असल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. आताच्या पिकांना आणि फळ बागा यांना पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आंबा, द्राक्षे आणि काजू बागांना पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. रब्बी पिकांनाही याचा फटका बसत आहे. या पिकांना बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT