Maharashtra Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: नववर्षाला पाऊस लावणार हजेरी, IMD चा येलो अलर्ट! तर दिल्लीत थंडीचा कडाका, महाराष्ट्रात काय स्थिती?

देशासह अनेक राज्यातील हवामानात झपाट्याने बदल होताना दिसत आहेत. तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये तुरळक हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशासह अनेक राज्यातील हवामानात झपाट्याने बदल होताना दिसत आहेत. यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्रासह अनेक राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अशातच वर्षाच्या शेवटी आणि नववर्षाच्या स्वागताला काही राज्यामध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

नुसताच पुरस्थितीतून बाहेर पडत असेलेल्या तामिळनाडूतील किनारपट्टीवर पुन्हा एकदा ३० डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याचबरोबर हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, राजस्थान, गोवा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाबमध्ये पावसाची शक्यता फार कमी प्रमाणाचत आहे.

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच पश्चिम राजस्थान, उत्तर पदेशमधील काही भाग आणि दिल्ली एनसीआरमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम दिल्ली-एनसीआरमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. स्कायमेट वेदरने दिलेल्या रिपोर्टनुसार, पंजाबच्या अनेक भागांमध्ये 31 डिसेंबरपर्यंत दाट धुके कायम राहतील. हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात 29 डिसेंबरपर्यंत दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे.

आज (बुधवारी), उत्तर राजस्थान आणि उत्तर मध्य प्रदेशच्या विविध भागात दाट धुक्यांची चादर दिसू शकते. स्कायमेट वेदर रिपोर्टनुसार, तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. देशातील उर्वरित भागात 29 डिसेंबरपर्यंत कोरडे हवामान राहील. 29 डिसेंबरच्या रात्रीपासून पश्चिम हिमालयात पाऊस आणि हिमवर्षाव सुरू होऊ शकतो. गंगा मैदानात दाट ते दाट धुके अपेक्षित आहे.

महाराष्ट्रात काय परिस्थिती?

राज्यात किमान तापमानात वाढ होत असली, तरी राज्यात गारठा कायम आहे. राज्यात किमान तापमान पारा १० ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नगर येथे १०.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुढील चोवीस तासांमध्ये किमान तापमानात कमी- जास्त होण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, वर्षाच्या शेवटी मुंबई, ठाणे, पालघर आणि पुण्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT