Monsoon Update  sakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Update : पाऊस होतोय सक्रिय;विदर्भात दमदार, मध्य महाराष्ट्रातही हजेरी

जून महिन्यात विदर्भात पावसाने हुलकावणी दिली होती. मात्र आता जुलैच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात ही पावसाने हजेरी लावली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जून महिन्यात विदर्भात पावसाने हुलकावणी दिली होती. मात्र आता जुलैच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात ही पावसाने हजेरी लावली. सोमवारी (ता. १) सकाळी आठ वाजेपर्यंत नाशिकमधील दहादेवाडी मंडलात १४५.३ मिलिमीटर तर यवतमाळमधील जवळा मंडलात १२८.५ मिलिमीटर पाऊस पडला. या मुळे राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होत असल्याचे दिसून येत असून खरिपातील पिकांना दिलासा मिळाला.

राज्यातील अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांत सर्वदूर जोरदार पाऊस झाला आहे. तर वाशीम, अमरावती जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस आहे.विदर्भात सुरुवातीपासून पाऊस प्रमाण कमी राहिला आहे. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून पोषक हवामान तयार झाल्याने दोन दिवसांपासून भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या भागांत बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. त्यानंतर यवतमाळ, वर्धा भागात पावसाचा जोर वाढला आहे. यवतमाळमधील कळगाव, तूपटाकळी मंडलात ११६.३ मिलिमीटर, तर मालखेड १११.३ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे शेतात चांगलेच पाणी साचले होते. पावसामुळे खरिपातील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिकांना नवसंजीवनी मिळाली.

कोकणातही मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. काही वेळा पावसाचे प्रमाण कमी होत असले तरी सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे.

यवतमाळ : जिल्हाभरात रविवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. काही मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. आर्णी तालुक्यात देखील जोरदार पाऊस बरसला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पाऊस दृष्टिक्षेपात...

  • मराठवाड्यात ढगाळ हवामानासह, अधूनमधून ऊन पडले.

  • यवतमाळ, नागपूरमध्ये ढगाळ हवामान.

  • पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, जळगाव भागात ढगाळ वातावरण.

  • कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरी.

  • घाटमाथ्यावर हलक्या सरी कायम.

  • पावसामुळे कोकणात भात लागवडीला सुरुवात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT