Rain in Konkan 
महाराष्ट्र बातम्या

कोकणात पावसाचा जोर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात अनेक ठिकाणी पावसाने जोर धरला आहे. 

मध्य महाराष्ट्र, विदर्भातही काही ठिकाणी हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. मंगळवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबइसह रायगड, रत्नागिरी, ठाणे, कोल्हापूर, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. रायगड जिल्ह्यातील उरण येथे सर्वाधिक १६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान आहे. मुंबई उपनगरांसह, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. संततधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला असून, लोकल उशिराने धावत होत्या.

राज्यात मुसळधारेचा अंदाज   
पावसाला पोषक हवामान आहे. गुरुवारी (ता.४) कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, साताऱ्याच्या घाटमाथा, पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT