Rain News esakal
महाराष्ट्र बातम्या

Rain Update : मॉन्सूनच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात सर्वसाधारण पाऊस

नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामामध्ये दुसऱ्या टप्प्यात देशात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामामध्ये दुसऱ्या टप्प्यात देशात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत ९४ ते १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सोमवारी (ता. ३१) व्यक्त केला. महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाजही यावेळी वर्तविण्यात आला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने मॉन्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. प्रशांत महासागरातील ‘अल निनो’ची स्थिती कायम आहे. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलामुळेच पुढील काळात अगदी जानेवारीपर्यंत याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

परिणामी मॉन्सूनच्या उत्तरार्धात पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात देशभरातच सरासरीच्या तुलनेत ९४ टक्के पाऊस पडेल. विशेषतः पश्चिम आणि मध्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. तर हिमालयाशी संलग्न असलेली राज्ये आणि पूर्व मध्य भारतात सरासरी एवढा पाऊस पडेल.

१९७१ ते २०२० कालावधीत देशातील मॉन्सून पावसाची आकडेवारी पाहता, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी ४२२.८ मिलिमीटर पाऊस पडतो. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.

राज्यातील पाऊस

मॉन्सूनच्या शेवटच्या दोन महिन्यांतील पावसाचा विचार करता, महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण, पूर्व विदर्भ वगळता बहुतांशी भागात सरासरीपेक्षा थोडा अधिक पाऊस झाला. मात्र, ऑगस्ट महिन्यात राज्याच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

यात उत्तर कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या नकाशावरून स्पष्ट होत आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलैच्या शेवटच्या पंधरवड्यात राज्यात चांगला पाऊस झाला होता.

असा आहे अंदाज

  • प्रशांत महासागरातील ‘अल निनो’ची स्थिती अधिक तीव्र होणार

  • मध्य आणि पश्चिम भारतात पावसाचा जोर ओसरणार

  • ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस

  • काही ठिकाणी खूपच तर काही ठिकाणी कमी पर्जन्यमान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT