Rain sakal
महाराष्ट्र बातम्या

Rain Update : राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात मॉन्सून सक्रिय झाला. त्यात बहुतांश ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. तर काही ठिकाणी अतिवृष्टी सारखी स्थिती झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर पावसाचा जोर आता ओसरण्याची चिन्हे आहेत. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला पोषक वातावरण आणि अरबी समुद्रातील कमी दाब प्रणाली विरून गेल्यामुळे आता राज्यातून पाऊससुद्धा काढता पाय घेणार आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. ३) राज्यात बहुतांश ठिकाणी निरभ्र वातावरणाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात मॉन्सून सक्रिय झाला. त्यात बहुतांश ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. तर काही ठिकाणी अतिवृष्टी सारखी स्थिती झाली होती. त्यामुळे अनेक जिल्ह्यांनी मॉन्सूनच्या पावसाची सरासरी गाठली होती.

दरम्यान मॉन्सूनने परतीच्या प्रवासाला वेग धरला असून सध्या वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागातून तो बाहेर पडला आहे. परतीच्या प्रवासासाठी पोषक स्थिती झाल्याने येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मॉन्सून मध्य आणि पश्चिम भारताच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे.

...म्हणून पाऊस निरोप घेण्याची शक्यता

हवामानाची स्थिती पाहता सध्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र झारखंड व छत्तीसगड परिसरावर सक्रिय आहे. तसेच मध्य महाराष्ट्रावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांची प्रणालीपासून दक्षिण छत्तीसगड असा हवेच्‍या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींना पाहता आता राज्यातून पाऊस निरोप घेण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मात्र पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित असल्याचे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले.

पुण्यात काहीशी विश्रांती

मागील आठवडाभरापासून हजेरी लावणाऱ्या पावसाने सोमवारी (ता. १) मात्र पुणे शहरात विश्रांती घेतली होती. मात्र, जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. येत्या दोन दिवसांनी पुणे व परिसरातून पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. सध्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा घट झाल्याने गारवा जाणवू लागला आहे. तर मंगळवारी (ता. ३) शहर आणि परिसरात अंशतः ढगाळ वातावरणासह पावसाची भुरभुर राहण्याची शक्यता आहे.

तापमानात होणार वाढ

परतीच्या प्रवासाला असलेला मॉन्सून पुढील काही दिवसांमध्ये राज्यातून बाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यातच आता कमाल आणि किमान तापमानात ही सरासरीपेक्षा वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली होती. यामुळे यंदा ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा ताप अधिक जाणवण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात देशातील बहुतांश भागात तापमानात वाढ आणि कमी पावसाचा अंदाज आहे. परिणामी ‘ऑक्टोबर हीट’ची अनुभूती होण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT