Rain
Rain 
महाराष्ट्र

कोकण-गोव्यासह विदर्भात वाढणार पावसाचा जोर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यात नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) सक्रिय झाले असून, कोकण-गोव्यात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली; तर विदर्भात मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोकण-गोव्यासह विदर्भातील पावसाचा जोर पुढील दोन दिवस कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकणात धुवाधार पाऊस पडत आहे. शनिवारी बहुतांश ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. चोवीस तासांत बंगालच्या उपसागरात उत्तरेकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्‍यता आहे. नैॡत्य मोसमी पावसाची उत्तरीसीमा शनिवारी स्थिर होती.

मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण असल्याने दोन ते तीन दिवसांत नैॡत्य मोसमी वारे देशाच्या मध्य भागात, पश्‍चिमेकडे आणि उत्तरेकडे सरकण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

SCROLL FOR NEXT