Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: राज्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, मुंबई-पुण्यातही संततधार सुरू

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने राज्याच्या काही भागांमध्ये हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने राज्याच्या काही भागांमध्ये हजेरी लावली आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विजर्भात विजांसह पाऊस हजेरी लावेल. तर, मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही पावसाची संततधार दिसून येईल. तर राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, येत्या २ ते ३ दिवसांमध्ये राज्यात पाऊस परतणार असून, पुढल्या 24 तासांसाठी सोलापूर, सांगली, कोल्हापूर, लातूर आणि सातारा या भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, राज्याच्या काही भागांमध्ये ताशी 40 किमी वेगाने वारे वाहणार असल्यामुळे नागरिकांना सतर्कचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

तर पुणे, मुंबई शहर परिसरात रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. अनेक दिवसाने परतलेल्या पावसाने उकाडा काहीसा कमी झाला आहे. पुण्यात अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

पुणे शहरातील वारजे, शिवणे कात्रज, कोंढवा, स्वारगेट, तसेच सिंहगड रोड परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक पावसाला सुरूवात झाल्याने पुणेकरांची पुरती तारांबळ उडाली. सकाळी कामावर निघालेले अनेकजण पावसामुळे अडकून पडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

SCROLL FOR NEXT