Almatti Dam esakal
महाराष्ट्र बातम्या

Almatti Dam : महापुराचा धोका टळला? महाराष्ट्र सरकारचं लक्ष असलेलं 'आलमट्टी धरण' भरलं काठोकाठ, 60 हजार क्युसेक विसर्ग

पावसाने उसंत घेतली असली तरी धरणात पाणी येण्याचं प्रमाण कायम

सकाळ डिजिटल टीम

गेल्या चार दिवसांपासून रोज दोन ते तीन टीएमसी पाणीसाठा धरणात वाढत असतानाही पाणी भरून घेतले जात नसल्याने रोज इतके पाणी विसर्गाच्या माध्यमातून खाली जात आहे.

चिक्कोडी : शेवटच्या टप्प्यात असतानाही आलमट्टी (Almatti Dam) शंभर टक्के भरून घेण्याबाबत प्रशासन सावध पाऊल टाकत आहे. दोन दिवसांपूर्वीच धरण ९९ टक्के भरले होते. मात्र, आवक होईल तितका विसर्ग करून साठा नियंत्रित करण्यात येत आहे.

यामुळे रविवारपेक्षा साठा किंचित सोमवारी (ता. ७) कमी झाला आहे. सोमवारी सकाळपासून धरणात ६४ हजार क्युसेक आवक होती. त्यामुळे विसर्गात पुन्हा बदल करून ६० हजार क्युसेक करण्यात आले आहे. रविवारी (ता. ६) आवक व विसर्गही ७० हजार क्युसेक करण्यात आला होता.

काल आवक कमी झाल्याने विसर्ग आणखी कमी केला आहे. दरम्यान, रविवारच्या विसर्गामुळे सोमवारी आलमट्टीच्या साठ्यात काहीशी घट झाली आहे. रविवारी जलाशयात १२१.६०६ टीएमसी (९८.८० टक्के) पाणीसाठा होता. सोमवारी संध्याकाळी धरणात ५१९.५० मीटर पातळी राखून १२१.२६२ टीएमसी (९८.५२ टक्के पाणी भरलेले आहे.

पावसाने उसंत घेतली असली तरी धरणात पाणी येण्याचे प्रमाण कायम आहे; पण पाणी साठा नियंत्रित करून आलमट्टी धरण प्रशासनाने अद्याप पूर्ण धरण भरण्याचे टाळले आहे. शनिवारी जवळपास ९९ टक्के धरण भरले होते. काल त्यामध्ये आणखी कमी पाणी झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून रोज दोन ते तीन टीएमसी पाणीसाठा धरणात वाढत असतानाही पाणी भरून घेतले जात नसल्याने रोज इतके पाणी विसर्गाच्या माध्यमातून खाली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT