Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; वाचा हवामान विभागाचा अंदाज

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची प्रतिक्षा कायम आहे. दरम्यान आजपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

दरम्यान आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज विदर्भातील काही भागात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज विदर्भ आणि मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यातही आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्यासह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांनाही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.

गेल्या महिन्याभरात पावसाने राज्यात दडी मारली आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच राज्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे सुकलेल्या पिंकाना नवसंजीवनी मिळाली आहे. अनेक भागात उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. संपूर्ण राज्यात गुरुवारी आणि शुक्रवारी बहुतांश ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं असून हे क्षेत्र पश्चिम आणि उत्तर-पश्चिमेकडे सरकण्याची चिन्हे दिसत असल्याने पाऊस पुन्हा सक्रीय होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाचं भयंकर कृत्य, विद्यार्थ्यावर थेट तलवारीने वार; कल्याणमधील नामांकित कॉलेजजवळ रक्तरंजित थरार

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Local Time Table : पश्चिम रेल्वेवर उद्यापासून लोकलचे नवीन वेळापत्रक; सहा नवीन फेऱ्या, एसी लोकलची संख्या १४७

Marathi News Live Updates : जयपूर परीक्षा केंद्रावरील वीजपुरवठा खंडित झाल्याबाबत TCS iON चे निवेदन

Velhe News : खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो सहकाऱ्यांसह राजगडावर श्रमदान

SCROLL FOR NEXT