rain 
महाराष्ट्र बातम्या

राज्याच्या अनेक भागात पावसाची उघडीप 

सकाळवृत्तसेवा

पुणे  -  राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. मंगळवारपर्यंत (ता.२८) कोकण वगळता बहुतांशी ठिकाणी पावसाची उघडीप राहणार आहे. त्यानंतर राज्यात पुन्हा पाऊस सुरू होण्याची अंदाज आहे. आज (ता.२७) कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

गेले काही दिवस मराठवाडा, खानदेश, विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर दोन दिवस मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. कोकणातही हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. रविवारी राज्यात अंशत: ढगाळ हवामान होते, तर पावसानेही उघडीप दिली. पुण्यातील राजगुरूनगर येथे ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्ट्याचा पूर्व भाग हिमालयाकडे सरकला असून, बिकानेरपासून मेघालयापर्यंत विस्तारला आहे. पाकिस्तान आणि परिसरावर असलेल्या पश्‍चिमी चक्रवातापासून कोकण किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच कोकण किनारपट्टीवर समुद्र सपाटीपासून २.१ ते ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे राज्यात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. 

रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस़ मिलिमीटरमध्ये ( स्त्रोत - हवामान विभाग ) : 

कोकण : भिरा ७९, राजापूर २५, दोडामार्ग ४४, कणकवली २८, मालवण २९, सावंतवाडी २९, 

मध्य महाराष्ट्र : अकोले ३७, धुळे ३६, गिधाडे २७, शिरपूर ४६, शिंदखेडा २५, गगनबावडा २७, पेठ ३२, सुरगाणा २७, राजगुरूनगर ७५, पुणे शहर ३७, सासवड २५, 

मराठवाडा : नायगाव खैरगाव २०, देगलूर ६२. 

विदर्भ : जळगाव जामोद २१, वरोरा २०. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: संतापजनक! '५० पर्यंत पाढे म्हणून दाखव'! चिमुकलीला जमलं नाही, संतापलेल्या पित्यानं क्रूरपणे मुलीला संपवलं

Mhada: सदनिका वितरणासाठी पात्रता निश्चिती सुरू, म्हाडाची मूळ भाडेकरूंसाठी प्रक्रिया; 'असा' करा अर्ज

Lakhpati Didi scheme : नाशिकच्या लेकींची गरुडझेप! अडीच लाख महिला झाल्या 'लखपती दीदी'; राज्यात नाशिक जिल्हा अव्वल

Pune Grand Tour Video : पुणे सायकल स्पर्धेत अचानक कुत्रा रस्तावर धावला अन् नेटीझन्स म्हणाले 'भागो भाई भागो'; मजेशीर व्हायरल व्हिडिओ...

साई भक्तांच्या अढळ श्रद्धा आणि भक्तीवर आधारित 'पालखी' चित्रपटाची घोषणा; 'हा' अभिनेता साईबाबांच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT