weather update maharashtra  google
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: सप्टेंबर महिन्यात मुसळधार की प्रतीक्षाच? पावसाच्या अंदाजानं वाढवली चिंता

राज्यात आता पावसाला कधीपासून सुरुवात होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. शेतीची कामे खोंळबली आहेत. अनेक भागांमध्ये दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले आहे. अशातच हवामान विभागाने येत्या २ ते ३ दिवसांमध्ये राज्यात पावसाची शक्यता वर्तवली होती. ऑगस्ट महिना सुरू झाला तरी अद्याप पावसाने दडी मारली आहे. राज्यात आता पुन्हा कधी पावसाला सुरुवात होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. सप्‍टेंबरमध्‍ये येणार्‍या 4 आठवड्यांसाठी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. सप्‍टेंबरच्‍या पहिल्‍या आठवड्यामध्ये दक्षिण द्वीपकल्प, महाराष्‍ट्र (मराठवाडा), कोकण, गोवासह मध्य भारतातील काही भागात पावसाला सुरुवात होणार आहे.

31 ऑगस्‍ट, सप्‍टेंबरमध्‍ये येणार्‍या 4 आठवड्यांसाठी IMD च्‍या पावसाचा अंदाज: सप्‍टेंबरच्‍या 1ल्‍या आठवड्याच्‍या मध्‍ये ते सप्‍टेंबरच्‍या मध्य; दक्षिण द्वीपकल्प, महाराष्‍ट्र (मराठवाडा), कोकण, गोवा यासह मध्य भारतातील काही भागांत पावसाच्‍या चांगल्या पुनरुज्जीवनाची शक्‍यता असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी यासंदर्भात टि्वट करुन दिली आहे

यावर्षी पावसामध्ये मोठी घट झाली आहे. राज्यातील अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. परंतु सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, राज्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होणार असून दुसऱ्या आठवड्यात दमदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT