Rainfall in the state is likely to increase
Rainfall in the state is likely to increase 
महाराष्ट्र

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

पुणे -  मराठवाडा, छत्तीसगड ते बंगालचा उपसागर या भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. तर अरबी समुद्र, कोकण, गोवा या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. महाबळेश्वर येथे राज्यातील  सर्वाधिक २७० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मराठवाडा व विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या.  


गेल्या आठवड्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्र, खान्देश या भागात हवामान ढगाळ आहे. यामुळे कोकणात बहुतांशी भागात मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणातील पोलादपूर येथे सर्वाधिक १९० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर जव्हार, तलासरी, महाड, मोखेडा, भिरा, मंडनगड, माथेरान, मानगाव, तला, कर्जत या ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. तर अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT