rain update esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात पुन्हा पावसासह गारपिट होणार | Weather Update

महेंद्र महाजन

नाशिक : पश्चिमी वाऱ्याच्या प्रभावामुळे गुरुवार (ता. ९) नंतर पुन्हा वातावरणात बदल होऊन राज्यात विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तयार होईल. थंडी, धुके, पाऊस अन पावसाबरोबर गारा कोसळतील. दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यासह महाराष्ट्र देखील गारपीट होऊ शकते, असा अंदाज भौतीकशास्त्राचे अभ्यासक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांनी तयार झालेली पिके काढून नुकसान टाळता येईल, असेही त्यांनी म्हटले.

लॉकडाऊनमुळे गारांचा आकार पूर्वीपेक्षा वाढला

ते म्हणाले, की पुढील तीन महिन्यात राज्यातील अनेक भागांना कमी-अधिक प्रमाणात क्युमोलोनिंबस ढगांची निर्मिती होत गारपिटीचा व गारांसह पावसाला शेतीसह अर्थव्यवस्थेला सामोरे जावे लागेल. पश्चिम महाराष्ट्रात गारपिटीचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे प्रदूषण कमी झाल्याने गारांचा आकार पूर्वीपेक्षा वाढला आहे.

डिसेंबरमध्ये पुन्हा पाऊस?

जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. पश्चिमी वाऱ्याच्या वेगानुसार दोन ते तीन दिवसात दिल्लीत थंडी, धुके आणि पाऊस होतो. दिल्लीच्या तापमानात घसरण होते. दिल्लीपासून साधारणतः तीन ते चार दिवसात पश्‍चिमी वारे हा थंडावा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र आदी राज्यात घेऊन येतो. पश्चिमी वारे अथवा पश्चिमी प्रक्षोभमुळे येणारा थंडावा आणि भौगोलिक प्रदेशानुसार असलेले बाष्प व तापमानातील चढ-उताराच्या प्रभावामुळे वातावरणात घुसळण निर्माण होऊन वातावरणातील अस्थिरतेने क्युमोलोनिंबस ढगांची निर्मिती होते. गडगडाटासह डिसेंबरमध्ये पुन्हा पाऊस होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT