महाराष्ट्र बातम्या

Mumbai - हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर 'दरबार हॉल'मधील कार्यक्रम रद्द

संजीव भागवत

तामिळनाडुत सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. या अपघातात बिपिन रावत हे गंभीर जखमी झाले आहेत.

तामिळनाडुत (Tamil Nadu) सीडीएस बिपिन रावत (Bipin Rawat) यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. या अपघातात बिपिन रावत हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या अपघाताच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात (Maharashtra) राजभवानवरील कार्यक्रम रद्द कऱण्यात आला आहे. राजभवनातील दरबार हॉलचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Presi यांच्या हस्ते होणार होते. मात्र हा कार्यक्रम स्थगित करण्यात येत असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governer Bhagat singh Koshyari) यांनी दिली आहे.

राजभवनात नव्यानं दरबार हॉल तयार करण्यात आला आहे. त्याचं व्हर्च्युअल पद्धतीनं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार होते. मात्र, तामिळनाडुत हेलिकॉप्टर दुर्घटना घडल्यानंतर राजभवानतील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. याची माहिती कार्यक्रम स्थळी येऊन राज्यपालांनी उपस्थित मान्यवरांना दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचेही सर्व नियोजित कार्यक्रम रद्द झाले असून ते दिल्लीला रवाना झाले आहेत.

दरबार हॉलच्या उद्घाटन समारंभासाठी अनेक मान्यवर आले होते. यामध्ये राज्यपालांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, निलम गोऱ्हे, मंगलप्रभात लोढा हेसुद्धा उपस्थित होते. राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे आणि मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे हे याठिकाणी होते. कार्यक्रम रद्द केल्यानंतर सर्व उपस्थित हॉलमधून निघून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT