Raj Thackeray News Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज ठाकरे निर्दोष; जळगावच्या खटल्यात न्यायालयाचा निर्णय

राज ठाकरे निर्दोष; जळगावच्या खटल्यात न्यायालयाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : उत्तर भारतीयांवरील हल्ल्याप्रकरणी २००८ मध्ये राज ठाकरेंना (Raj Thackeray) अटक झाल्यानंतर जळगावात त्याचे पडसाद उमटले होते. शहरात बंदही पुकारण्यात आला होता. याप्रकरणी जळगाव न्यायालयात दाखल खटल्यात राज ठाकरेंसह अन्य चौघांची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली.

राज यांच्या अटकेचे पडसाद

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, मुंबई येथे रेल्वेत मराठी मुलांची भरती करण्याच्या मागणीसोबत उत्तर भारतीयांवरील हल्ल्याप्रकरणी सन २००८ मध्ये राज ठाकरेंवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले. त्याविरोधात मनसेने (MNS) राज्यभर आंदोलनही केले. मनसेतर्फे केलेल्या आंदोलनानंतर राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ या अटकेचे पडसाद २१ ऑक्टोबर २००८ ला जळगावतही उमटले होते. जळगावात मनसे पदाधिकाऱ्‍यांनी मोर्चा काढून बंद पुकारला होता.

याप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंसह मनसेचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस ॲड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, रज्जाक सय्यज, प्रेमानंद जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चौघांना वॉरंट बजावल्यानंतर न्यायालयाने राज यांना १५ हजारांचा जामीन मंजूर केला होता. तसेच या खटल्याच्या कामात कायमची गैरहजर राहण्याची परवानगीही दिली होती. या खटल्याची सुनावणी शुक्रवारी (ता.११) झाली. जळगाव न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात मनसेच्या वतीने अॅड. संदीप पाटील यांनी कामकाज बघितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT