Raj Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : एकनाथ शिंदेंनी जपून राहावं, राज ठाकरे असं का म्हणाले?

Sandip Kapde

Raj Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘लोकमत’च्या पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जपून राहण्याचा सल्ला दिला आहे.

राज ठाकरे यांनी काही नेत्यांना काय सल्ला द्याल, असा प्रश्न अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना विचारला. यावर एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले असता त्यांनी जपून राहावे असे राज ठाकरे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी वरते संबंध नीट ठेवावे. अजित पवार बाहेर लक्ष देतात तेवढे त्यांनी काकांकडे लक्ष द्यावे. उद्धव ठाकरे - आदित्य ठाकरे स्वयंभू आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.

उपमुख्यमंत्री कोणासोबत आहेत ?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणासोबत आहेत तेच कळत नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोला लगावला आहे. याबाबतचा प्रश्न अमृता फडणवीस यांनी त्यांना विचारला होता.

कधी तुम्ही राष्ट्रवादीच्या जवळ दिसता तर कधी तुम्ही शिंदे गटाच्या जवळ दिसता तर कधी भाजपला टाळी देता, पण आता तुम्ही कोणासोबत आहात? या अमृता फडणवीसांच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील सध्या कोणाबरोबर आहेत तेच कळत नाही. कारण ते पहाटे गाडी घेऊन कुठेतरी जातात, तुम्हाला त्याचा पत्ता नसतो. कधीतरी ते शिंदेंसोबत असतात कधीतरी अजित पवारांचा चेहरा उतरलेला दिसतो. त्यामुळं कोणाला बोलणं-भेटणं ही पत्रकारांसाठी बातमी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi: अखेर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला भारतात आणलं; NIA कडून अटक, कसा बनला भारतातील 'मोस्ट वॉन्टेड'?

Mumbai Crime: पाणी भरण्यावरून वाद; महिलेचं डोकं फिरलं; घरातून मॉस्किटो किलर स्प्रे आणलं अन्...; व्यक्तीसोबत नको ते घडलं

चालू सीझरमध्येच डॉक्टरांनी मला प्रश्न विचारला की... मराठी अभिनेत्रीने सांगितला डिलिव्हरीचा तो अनुभव

IND vs SA: 'कोलकाता कसोटीच्या चार दिवसांपूर्वी BCCI चे क्युरेटर आले आणि...', सौरव गांगुलीचा खुलासा

अजितदादा माफ करा, पदरात घ्या; लेकाने बोट दाखवून चॅलेंज दिल्यानंतर राजन पाटलांची माफी

SCROLL FOR NEXT