Raj Thackeray appeal to voters to vote for Marathi speaking candidates in Karnataka election 2023  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : "ही संधी दवडू नका"; कर्नाटक निवडणूकीआधी राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन

रोहित कणसे

कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज (८ मे) शेवटचा दिवस आहे. मागील काही दिवसापासून धडाडत असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. तर १० मे रोजी या निवडणूकांसाठी मतदान होईल. या निवडणूकीत महाराष्ट्रातील नेत्यांनी देखील सीमा भागातील प्रचारात सहभाग घेतला. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत मतदारांना अवाहन केलं आहे.

राज ठाकरेंनी सोशल मीडियावर लिहीलेल्या पोस्टमध्ये पक्ष कोणताही असेल तरी मराठी उमेदवारालाच मतदान करण्याचे अवाहन केले आहे.

राज ठाकरे काय म्हणाले आहेत?

राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा असा अग्रह व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, "कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा, आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरु असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय ह्याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी."

ते पुढे लिहीतात की, "तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही."

...अशी लोकं असायला हवीत

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "मध्यंतरी जेंव्हा पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेंव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेंव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत."

ही संधी दवडू नका

अखेरीस राज ठाकरेंनी मतदारांनी ही संधी हातची घालवू नये असंही म्हटलं आहे. "ह्यासाठी सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. मराठी आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका." असं त्यांनी लिहीलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT