Raj Thackeray asked the opposite on Amrita Fadnavis Question Political Future Devendra Fadnavis maharashtra politics  
महाराष्ट्र बातम्या

Amruta Fadnavis: राज ठाकरेंनी उलट सवाल करताच अमृता फडणवीसांनी घेतली नवऱ्याची बाजू

मी देवेंद्र फडणवीस यांची बायको म्हणूनही मुलाखत घेत नाही; असं अमृता यांनी मुलाखतीच्या सुरवातीलाच स्पष्ट केलं होतं

धनश्री ओतारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. यावेळी राज ठाकरे यांना अनेक सवाल उपस्थित केले. त्यावेळी त्यांने दिलखुलास उत्तर दिली. दरम्यान, मुलाखतीमधील एक किस्सा चांगलाच चर्चेत आला आहे. तो म्हणजे अमृता फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली बाजू. (Raj Thackeray asked the opposite on Amruta Fadnavis Question Political Future Devendra Fadnavis maharashtra politics )

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे यांची मुलाखत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी घेतली. यावेळी, अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंना राजकारणात नेमकं ते कुणाच्या बाजूने आहेत? असा सवाल उपस्थित केला. त्यावर राज ठाकरेंनी उलट सवाल केला. मात्र, त्यांचा हा सवाल अमृता फडणवीसांनी वैयक्तिक घेतला.

विशेष म्हणजे, मुलाखतीच्या सुरवातीलाच अमृता फडणवीसांनी disclaimer दिला की, भाजपचा काही संबंध नाही, मी देवेंद्र फडणवीस यांची बायको म्हणूनही मुलाखत घेत नाही. तरीही...

नेमकं काय घडलं?

अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंना राज ठाकरे कधी राष्ट्रवादीसोबत दिसतात कधी बाळासाहेबांच्या शिवसेनेजवळ दिसतात, कधी भाजपला टाळी देता.. कभी हाँ कभी ना खूप पाहिलं आता पुढे हम साथ साथ है कोणाबरोबर आणि केव्हा...

फडणवीसांच्या या उत्तराला राज ठाकरेंनी उलट सवाल केला. मिश्किलपणे हसत म्हणाले, तुम्ही देवेंद्र याच्या पत्नी म्हणून बोलत नाही आहात....काय आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीही सध्या कोणासोबत आहेत तेच कळत नाही....

असं राज ठाकरेंनी बोलताच अमृता फडणवीसांनी सवाल वैयक्तिक घेत नाही नाही ते लॉयल आहेत.

त्यावर राज ठाकरेंनी न थांबता ते पहाटे गाडी घेऊन कुठे तरी जातात. त्याचा तुम्हाला पत्ता नसतो, कधी कधी ते शिंदेंबरोबर असतात. तर कधी अजित पवार नाराज असतात..अशी उदाहरणं देऊन राज ठाकरेंनी अमृता फडणवीसांना टोमणे मारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT