महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray on Ajit Pawar: 'लाडकी बहीण' अन् 'लाडका भाऊ' एकत्र आले असते तर....; राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला

मुंबईतील मनसेचा पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी टोलेबाजी केली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारनं नुकत्याच लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी शेलक्या शब्दांत टीका केली. मुंबईत आयोजित मनसेचा पदाधिकारी मेळाव्यात त्यांनी टोलेबाजी केली.

आपल्याकडं पाण्याच्या, आरोग्या आणि रोजगाराच्या मूळ प्रश्नांवरती बोलायला वेळ नाही. आमच्याकडं काय सुरुए? तर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ. अहो लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. योजना कशाला पाहिजे त्यासाठी? या योजनांसाठी राज्य शासनाकडं मुळात पैसे आहेत का? रस्त्यावरचे खड्डे बुजवायला पैसे नाहीत आणि एकदम कुठले खड्डे बुजवणार आहेत, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राज्य शासन आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.

राज ठाकरे पुढे म्हणाले, "मूळ महाराष्ट्राचे प्रश्न आहेत त्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. हेच तुमचं निवडणुकांचं प्रचार असला पाहिजे. एकमेकांवर फक्त शिव्या द्यायच्या आणि लोकांचं लक्ष विचलीत करायचं यातून निवडणुका करायच्या यातून हाताला काही लागणार नाही"

पक्ष सोडून जाणाऱ्यांना मीच रेड कार्पेट घालतो

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला या सर्व राजकीय पक्षांमध्ये जे काही घमासान होणार आहे ते न भुतो न भविष्यतो असं असणार आहे. मला कोणीतरी सांगितलं की मनसेतील काही पदाधिकारी दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांना मी स्वतः रेड कार्पेट घालतो की जा म्हणून. कारण भविष्याचा जो सत्यानाश करुन घ्यायचा आहे तो घ्या. कारण त्यांचंच काही स्थिर नाही, लोकसभेला काय झालंय माहिती आहे ना?

त्यांनाच तिकीटं दिली जातील

आज तुम्हाला बैठकीला बोलवण्याचं महत्वाचं कारण म्हणजे हे जे सर्व्हे वैगरे असतात ना? ते नेमके कुठे फिरतात काही माहिती नाही. पण सर्व्हेसाठी येणारे लोक तुम्हाला भेटतील काय मुळात परिस्थिती आहे त्यांना समजावून सांगा. काय गोष्टींचं गणित घडू शकतं याचा नीट विचार करा. यानंतर निवडून येण्याची क्षमता असलेल्या मनसेकडून तिकीटं दिली जातील. तिकीट मिळाल्यानंतर मी पैसे कढायला मोकळा असं वाटणाऱ्या कोणालाही तिकीटं दिली जाणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

Latest Marathi News Update: एमपीएससी गैरव्यवहार चौकशी,१६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आवाहन

Youth Congress Protest in Karad Against Sanjay Gaikwad : शेतकऱ्यांच्या वक्तव्याचा निषेध; कऱ्हाडमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याला मांसाचे तुकडे अडकवत युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन

Sakal Impact : 'सकाळ' इम्पॅक्ट; एमपीएससी गैरव्यवहार चौकशीला अखेर मुहूर्त, १६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT