Ketaki Chitale meets Raj Thackeray
Ketaki Chitale meets Raj Thackeray 
महाराष्ट्र

राज ठाकरेंनी केले केतकीचे अभिनंदन!

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : "सोशल मीडियावरील ट्रोल्सना तू ज्याप्रकारे रोखठोक उत्तर दिलंस, त्यामुळे अनेक दबलेल्या आवाजांना तू व्यक्त होण्यासाठीची हिंमत दिलीस, त्याबद्दल तुझं अभिनंदन" अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेत्री केतकी चितळेचे अभिनंदन केले. 

केतकी चितळेवर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील ट्रोल्सनी अत्यंत घाणेरड्या शब्दात टीका केली होती. त्या टीकेला केतकीने एका व्हिडिओ पोस्टद्वारे अत्यंत रोखठोक उत्तर दिले होते. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी जितेंद्र ठाकरे यांच्यासोबत केतकी चितळे आज (शुक्रवार) सकाळी राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानी आली होती. "राज ठाकरे यांनी माझं अभिनंदन करण्यासाठी मला बोलावलं होतं," अशी प्रतिक्रिया केतकीने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

"सोशल मीडियावरील महिलांशी मतभेद झाल्यावर काहीजण अत्यंत घाणेरड्या शब्दांत महिलांवर टीका करतात. दुर्दैवाने, आजही महिलांच्या मतांचा, तसेच त्यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा आदर करण्याची वृत्ती समाजात, विशेषतः सोशल मीडियात दिसत नाही. महिलांवर बीभत्स शब्दांत टीका करणाऱ्यांना केतकीने जे रोखठोक उत्तर दिले आहे, ते निश्चितच कौतुकास्पद आहे" असे मत मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT