Raj Thackeray VS Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवार शिवाजी महाराजांचा कधीच उल्लेख करत नाहीत, कारण.. - राज ठाकरे

सकाळ डिजिटल टीम

'शरद पवार स्वत: नास्तिक आहेत. त्यामुळं ते धर्माकडं नास्तिकतेनं पाहतात.'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणाला सुरुवात झालीय. ठाणे पश्चिमच्या डॉ. मूस रोडवर राज ठाकरेंची सभा सुरूय. या सभेला मनसेनं 'उत्तर सभा' असं नाव दिलंय. नरेंद्र मोदींना (Narendra Modi) माझं सांगणं आहे की, एक म्हणजे समान नागरी कायदा आणा आणि दुसरं म्हणजे या देशातील लोकसंख्येवर नियंत्रण ठेवता येईल असा कायदा आणा, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान मोदींकडं केलीय.

या उत्तर सभेत राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर देखील निशाणा साधलाय. शरद पवार कधीही छ. शिवाजी महाराजांचं (Chhatrapati Shivaji Maharaj) नाव घेत नाहीत. कारण, शिवरायाचं नाव घेतलं तर मुस्लिम मतं जातील याची त्यांनी भीती वाटते म्हणून, ते कोणत्याही सभेत छ. शिवाजी महाराजांचं नाव घेणं टाळतात, असा आरोप राज ठाकरेंनी केलाय.

ते पुढं म्हणाले, शरद पवार स्वत: नास्तिक आहेत. त्यामुळं ते धर्माकडं नास्तिकतेनं पाहतात. ते धर्म-बिर्म, देव-बिव काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीनं राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात. देशात, महाराष्ट्रात असंख्य जाती आहेत. प्रत्येक जातीला आपापल्या जातीबद्दल अभिमान होता. 1999 ला राष्ट्रवादीचा जन्म झाला आणि त्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष सुरू झाला, असा घणाघातही त्यांनी राष्ट्रवादीवर केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : हुंड्यासाठी पत्नीला मुलासमोर जिवंत जाळलं, पतीचा एन्काउंटर; पोलिसांनी झाडली गोळी

Online Shopping Discount : कपडे अन् इतर वस्तू सगळ्यात स्वस्त कुठे मिळतात? तुमच्याचं फायद्याचं आहे, पाहा एका क्लिकवर..

Latest Marathi News Updates : जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी एक क्विंटलचा फुलांचा हार

Amartya Sen : ‘मतदानापासून वंचित राहण्याची भीती’, मतदारयाद्यांच्या फेरपडताळणीवरून अमर्त्य सेन यांची चिंता

Jalgaon Ganeshotsav : जळगावात गणेशोत्सवाची लगबग; मूर्ती-सजावटीचे स्टॉल सजले, १० टक्के भाववाढ

SCROLL FOR NEXT