Raj Thackeray & Fadanvis  Sakal
महाराष्ट्र बातम्या

भेट झालीच नाही! राज ठाकरे अन् फडणवीसांकडून स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

Devendra Fadanvis And Raj Thackeray Meet : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सागर बंगल्यात भेट झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता या भेटीबाबत दोन्ही नेत्यांकडून भेट झाल्याचं वृत्त फेटाळण्यात आले आहे. शिवसेनेतील फुट आणि मनसे भाजपमधील संभव्य युती याबाबत वारंवार होणारी चर्चा याबाबत ही भेट झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता दोन्ही नेत्यांनी अशा प्रकारची भेट झाल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे.

राज ठाकरे फडणवीसांमध्ये तासभर चर्चा रंगली. सकाळी ८ वाजता राज ठाकरे सागर बंगल्यावर दाखल झाले होते. या भेटीदरम्यान, राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यादेखील उपस्थित होत्या. आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक मनसे स्वतंत्र लढवणार की भाजपासाबोत युती करुन लढवणार, याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. त्या पार्श्वभूमिवर ही भेट झाल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता दोन्ही नेत्यांनी या अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे सकाळपासून सुरू असलेल्या चर्चांना काहीसा ब्रेक लागला आहे.

मुंबई महापालिकेतील शिवसेनेचा विजयाचा अश्वमेध रोखायचा विडाच भाजपाने उचललेला आहे. अशा स्थितीत मनसेची भूमिका महत्त्वाची असणार आहे. हिंदुत्वाच्या वाटेवर असलेले राज ठाकरे या निवडणुकीसाठी भाजपासोबत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. दोनदिवसांपूर्वी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी भाजपा-शिवसेनेच्या युतीत एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे पार्टनर आहेत. राज ठाकरेंनी महाराष्ट्रात घौडदोड केली तर पुढे बघू. राज ठाकरेंसोबत आमचे खूप चांगले संबंध आहेत. असे वक्तव्य केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान बँकांना 12 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात कधी बंद राहणार बँका? पाहा संपूर्ण यादी

शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून दुकानदाराला लाठ्या-काठ्यांनी मारहाण, लाथाबुक्क्याही मारल्या; CCTV व्हिडीओ समोर

Latest Marathi News Update : जमीन लिलावाच्या बहाण्याने सव्वा कोटींची फसवणूक

HP Laptop: एचपीचा प्रीमियम लॅपटॉप भारतात लाँच; तब्बल 160GB vRAM आणि जबरदस्त AI फीचर्ससह बाजारात एंट्री!

Sujay Vikhe Patil: सुजय विखे पाटील आणि विवेक कोल्हे एकत्र; रामगिरी महाराज म्हणाले, ‘खासदारकीची खुर्ची हवी’

SCROLL FOR NEXT