mns chief raj thackeray
mns chief raj thackeray  
महाराष्ट्र

शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे परतले, पुन्हा आवाज घुमणार

धनश्री ओतारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. दीड तास ही शस्त्रक्रिया पार पडली. दरम्यान राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती ट्विट करत दिली आहे.

राज ठाकरे यांनी ट्विट करत मी घरी पोहचलो आहे. असे म्हटले आहे.

''आपल्या आर्शिवादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थितरीत्या पार पडली आहे. काही वेळापूर्वीच, रुग्णलातून बाहेर पडून मी घरी पोहचलो आहे. आपले आर्शिवाद आणि प्रेम असेच कायम राहो! आपला नम्र राज ठाकरे. ''

अशा आशयाचे ट्विट शेअर करत राज ठाकरे यांनी डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती दिली आहे.

राज ठाकरे 18 जूनला मुंबईतल्या लिलावती रुग्णलायत दाखल झाले होते, त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. याआधी एक जूनला शस्त्रक्रिया होणार होती. पण राज ठाकरे यांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत

टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं बळावल्याने मे महिन्यात राज ठाकरे यांनी पुणे दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर तब्येतीच्या कारणाने त्यांनी नियोजित अयोध्या दौराही स्थगित केल्याचं जाहीर केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : पुलवामा येथे बोट उलटली, दोन जण बेपत्ता

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

Sakal Vidya : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रमाबाबत चिंचवडमध्ये येत्या रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

BG Kolse Patil : ‘पंतप्रधानांना ३०० कोटींचा हिशोब द्यावा लागेल’; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची टीका

SCROLL FOR NEXT