Raj Thackeray Dr. Babasaheb Ambedkar, Mahaparinirvan Din 2022 Sakal
महाराष्ट्र बातम्या

Mahaparinirvan Din 2022: राज ठाकरेंनी उलगडले डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे न उलगडलेले पदर...

...पण त्याव्यतिरिक्तही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते सर्वप्रथम मराठी समाजाला आणि मग विश्वाला कळायलाच हवेत.

सकाळ डिजिटल टीम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. या दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉ. आंबेडकरांच्या आठवणी जागवल्या आहेत, तसंच त्यांनी आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलूही उलगडले आहेत. राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आहे.

आपल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात, " आपण आपल्या महापुरुषांना अत्यंत संकुचित दृष्टिकोनातून पाहतो, मानतो, जगासमोर मांडतो. पण महामानवाच्या महापरिनिर्वाणदिनी आज मला पुन्हा सांगावंसं वाटतं की आपल्या महापुरुषांचं अष्टावधानी कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त अफझल खानाचा कोथळा, शाहिस्तेखानाची बोटं छाटणं, आग्र्याहून सुटका, सुरत स्वारी नाही तर त्यांचा राज्यकारभार, कृषी धोरण, राज्य कोष, वास्तू रचना, राज्य व्यवस्था, न्यायदान पद्धत अशी असंख्य गुण वैशिष्ट्य सांगता येतात."

"तसंच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वालाही अनेक पदर आहेत. बाबासाहेबांनी शेकडो वर्ष गुलामगिरीत जगणाऱ्या वंचितांसाठी यशस्वी लढा दिला हे त्यांचं मोठं कार्य आहेच तसंच भारतीय राज्य घटनाकर्ते हा त्यांच्या आणि देशाच्या कारकिर्दीतला निर्विवादपणे अत्युच्च बिंदू पण त्याव्यतिरिक्तही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते सर्वप्रथम मराठी समाजाला आणि मग विश्वाला कळायलाच हवेत."

"बाबासाहेब अर्थशास्त्रात उच्च विद्या विभूषित होते. त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये मांडलेल्या ‘दी प्रॉब्लेम ऑफ दी रूपी’ ह्या प्रबंधाच्या प्रेरणेतून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. बालविवाह, बहुपत्नीत्व ह्यामुळे ‘स्त्री’ स्वत्व गमावून बसली होती. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी प्रयत्न केले पण तेव्हा त्यांना विरोध झाला. अखेर भारतीय समाजाने हळूहळू द्विभार्या प्रतिबंधक कायदा स्वीकारला, वडिलांच्या संपत्तीत लेकीला समान वाटा मिळाला, विवाहाच्या निर्णयात स्वातंत्र्य मिळालं.. त्याचवेळेस हा मानवतावादी कायदा आला असता तर आज चित्र वेगळे असते. असो. बाबासाहेबांनी स्त्रियांना बाळंतपणाची भरपगारी रजा, नारायण लोखंडे ह्यांच्या सहमतीने रविवारी कष्टकऱ्यांसाठी साप्ताहिक सुट्टी, कामाचे १२ वरून ८ तास, कामगार संघटनांना मान्यता, आरोग्य विमा, संपाचा कायदेशीर अधिकार अशा अनेक हक्कांसाठी लढा दिला आणि मान्यता मिळवून घेतली. इतकंच काय तर त्यांचं मराठी भाषेवर असणारं प्रभुत्व अद्भुत होतं आजही त्यांचं लिखाण वाचताना थक्क व्हायला होतं. माझ्या आजोबांच्या आवाहनानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी त्यांनी मांडलेली भूमिका ही चळवळीला शक्तिवर्धक ठरली."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ रिल्स अपलोड करणे पडले महागात; पुणे पोलिसांनी काढली धिंड

...आणि नीरजसाठी लिहिलेली चिठ्ठी बाबांनी वाचली; मृणाल दुसानिसने सांगितला लग्नाआधीचा मजेदार किस्सा

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोनं किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल, तर 'हे' स्वस्त उपाय केल्यास होईल धनप्राप्ती अन् माता लक्ष्मी होईल प्रसन्न

Jalgaon News : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरवर रुग्णांच्या नातेवाइकांचा आक्रमक हल्ला

Natural sleep remedies : तुमच्या डोक्यात रात्री खूप विचार येतात का? ताण कमी करून शांत झोप येण्यासाठी 'हा' घरगुती उपाय नक्की करा

SCROLL FOR NEXT