Raj thackeray grandson Sakal
महाराष्ट्र बातम्या

"कुणी गोविंद घ्या, कुणी..."; राज ठाकरेंच्या नातवाचं आज बारसं

गेल्या महिन्यात ५ एप्रिल रोजी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज ठाकरे यांच्या नातवाचा नामकरण सोहळा आज पार पडणार आहे. शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी ठाकरे कुटुंबीय आणि मित्र परिवार उपस्थित राहणार आहेत.

गेल्या महिन्यात ५ एप्रिल रोजी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात राज ठाकरेंची सून मिताली यांनी मुलाला जन्म दिला. या छोट्या पाहुण्याच्या आगमनाने राज ठाकरे आजोबा तर त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आजी झाल्या आहेत. या दोघांनीही एका मुलाखतीदरम्यान बोलताना नातवासोबतच्या आठवणी शेअर केल्या होत्या.

नातवासोबतच्या सुखद अनुभवांबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की अमित लहान होता, त्याचा जेव्हा जन्म झाला तेव्हा मी दोन दोन महिने बाहेर असायचो, सतत फिरतीवर असायचो. त्यामुळे मला जो वेळ मुलांसोबत घालवता आला नाही, तो आता नातवंडांसोबत घालवता येणार आहे. आजीआजोबा होणं ही एक खूप सुखद आणि उत्साहाची गोष्ट असल्याची भावना शर्मिला ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

नावांबद्दलही आपल्या घरात चर्चा सुरू असल्याचं राज आणि शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं होतं. मिश्किलपणे भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की आम्ही नातवाचं नाव प्रदीप ठेवणार आहे. अमितने तर सांगितलंय की मी माझ्या मुलाचं नाव भालचंद्र ठेवणार. पण खूप नवी नवी नावं येतायत, आमच्या घरातही त्याबद्दल चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Accident : भीषण रेल्वे दुर्घटना! मालगाडी अन् पॅसेंजर ट्रेन भिडल्या; अनेक प्रवाशांचा मृत्यू

२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान! निवडणुकीचा कार्यक्रम कसा, आचारसंहितेचा नियम काय, अर्ज कसा करायचा, मतदारांना मोबाईल नेता येणार नाही

Kalyan News: कल्याण शीळ रोडवर २ दिवस वाहतुकीत बदल, 'असे' असतील पर्यायी मार्ग

Latest Marathi News Live Update : अजित पवार गटाची उत्तर महाराष्ट्रमधील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

Winter Birds: थंडीची चाहूल लागताच पाहुणे पक्ष्यांचे आगमन; जाणून घ्या सोलापूरमध्ये कुठे आणि कसे पाहाल पक्षीवैभव!

SCROLL FOR NEXT