Ayodhya Ram Mandir Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ayodhya Ram Mandir: राज ठाकरेंना खरंच निमंत्रण दिलंय का? राम मंदिराच्या उद्घाटनावरुन 'राज'कारण तेजीत

पुढील वर्षी अयोध्येत २२ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या राम मंदिराच्या उद्‍घाटन सोहळ्यावरून राजकारण पेटले आहे. या सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण काही मोजक्याच विरोधी नेत्यांना देण्यात आले असून त्यातूनही काही नेत्यांना वगळण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुढील वर्षी अयोध्येत २२ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या राम मंदिराच्या उद्‍घाटन सोहळ्यावरून राजकारण पेटले आहे. या सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण काही मोजक्याच विरोधी नेत्यांना देण्यात आले असून त्यातूनही काही नेत्यांना वगळण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यातून या सोहळ्यासाठी जाणाऱ्या अतिमहत्त्वाच्या नेत्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा समावेश असल्याची चर्चा सुरू झाली असून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंना मात्र निमंत्रण देण्यात आलेले नाही अशा चर्चा सुरू होत्या. अशातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांना निमंत्रण मिळालं नसल्याची माहिती दिली आहे.

राम मंदिराच्या उद्‍घाटन सोहळ्याचे निमंत्रण मिळालेले नाही, अशी माहिती एबीपी माझाला दिल्याचे वृत्त आहे. राज ठाकरे यांना राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिलेलं आहे असं भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं.

राज ठाकरेंच्या निकटवर्तींयांनी याबाबतची माहिती दिली असल्याचे एबीपी माझा या वृत्तवाहिनीने म्हटलं आहे.दरम्यान, २२ जानेवारीला हा सोहळा पार पडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगात रजिस्टर असलेल्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुखांना निमंत्रण जाणार आहे. काल गिरीष महाजन यांनी राज ठाकरेंना निमंत्रण मिळाल्याचं सांगितलं त्यानंतर त्यांच्या निकटवर्तींयांनी त्यांना अद्याप निमंत्रण मिळालं नसल्याची माहिती दिली आहे.

काय म्हणाले होते गिरीष महाजन?

केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे नसतील मात्र राज ठाकरे असतील. अयोद्धेच्या राम मंदिरावरुन आमच्यावर टीका केलीय त्यांना बोलवण्याचं कारण काय? उद्धव ठाकरेंचं अयोद्धेच्या राम मंदिराच्या उभारणीत काय योगदान हे सर्वांना माहिती आहेत. उद्धव ठाकरे हे साधे आमदार आहेत. त्यामुळे केंद्राच्या ‘व्हीव्हीआयपी’च्या यादीत ते नसतील; पण राज ठाकरे यांचा मात्र समावेश असेल.

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत उद्धव ठाकरेंचे योगदान काय? घरात बसून भूमिका घेणे आणि प्रत्यक्ष कारसेवा करणे यात फरक आहे. आम्ही वीस दिवस कारागृहामध्ये होतो. तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते? बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत दुमत नाही. मात्र जे बोलतायेत ते आयत्या बिळावरचे नागोबा आहेत. असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Price Hike : 'गोकुळ'कडून तूर्तास दूध दरवाढीचा निर्णय नाही; नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका, मुख्यमंत्र्यांसह दूध विक्रेत्यांशी साधणार संवाद

Children's Day 2026 Wishes in Marathi: लहानपण देगा देवा! बालदिनानिमित्त शेअर करा बालपणाच्या आठवणी जागवणारे खास संदेश

Dilshad Mulla OBC Caste Certificate Invalid : 'काँग्रेस'च्या दिलशाद मुल्ला यांचा ओबीसी जातीचा दाखला ठरविला अवैध; नगरसेवकपद धोक्यात, मुल्ला उच्च न्यायालयात मागणार दाद

Tiger Spotted in Chandgad : चंदगडमध्ये थरार! तेऊरवाडी-हडलगे मार्गावर रात्रीच्या वेळी चालत्या गाडीसमोर आला वाघ; नागरिकांमध्ये मोठी दहशत

Pune News: सिंहगड संस्थेला पुन्हा दणका ;आणखी २५ महाविद्यालयांवर प्रशासकाची नेमणूक

SCROLL FOR NEXT