Raj Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : भानगडीच नकोत! राज ठाकरेंकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा

संतोष कानडे

खेडः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजपासून कोकण दौरा सुरु केला आहे. खेड येथे बोलतांना राज ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली.

खेडमध्ये बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात जे सुरु आहे ते वाईट आहे. तेच ते घडत असेल तर मतदानाला काही अर्थ उरला आहे का? असा प्रश्न पडतोय. जे सुरु आहे त्यात आनंद मिळत असेल तर मग भोगा, असा संताप राज यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, तुमची मला साथ हवी आहे. समृ्द्धी महामार्ग साडेचार वर्षात होऊ शकतो तर सतरा वर्षे झाले कोकणातला रस्ता का पूर्ण होत नाही? खरं तर हा दौरा तुमच्या मनगटात ताकद देण्यासाठी आहे. आगामी नगर परिषद निवडणुका आपण स्वबळावर लढवणार आहोत. कुणाच्या युत्या नको अन् भानगडी नकोत. असं म्हणून राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला आहे.

येत्या पंधरा दिवसांमध्ये राज ठाकरे पक्षाचा मेळावा घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज सकाळी चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यामध्ये जो व्यभिचार सुरु आहे तो मी कधीही करणार नाही. तडजोड करावी लागली तर घरात बसेन परंतु तडजोड करणार नाही. कार्यकर्त्यांनी मनाने एकत्र येऊन काम करणं आवश्यक असल्याचं राज यांनी सांगितलं.

राज ठाकरेंनी आजपासून कोकण दौऱ्याला सुरुवात केली असून चिपळूणमधील पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर ते पुढे खेड, दापोलीकडे रवाना झाले होते. त्यांच्यासोबत मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT