Raj thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

मनसेचं ठरलं! ३ मे रोजी वाजणार 'भोंगा'; पत्रकार परिषदेत केली घोषणा

मशिदींवरचे भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरेंनी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे या दिवसाकडे राज्याचं लक्ष लागून आहे.

सकाळ डिजिटल टीम

मशिदींवरचे अजानचे भोंगे काढले नाहीत तर आम्ही त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू अशा आशयाचं विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्या दिवशीच्या सभेत केलं आणि महाराष्ट्रातल्या राजकारणात खळबळ माजली. हे भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरेंनी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिला होता. त्यामुळे ३ मे रोजी होणार काय, याकडे राज्याचं लक्ष आहे. त्याबद्दलच आज पत्रकार परिषद घेत मनसेने माहिती दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सकाळीच ट्वीट करत वातावरण निर्मिती केली होती. आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत मोठी घोषणा..मोठ्ठा 'आवाज' होणार आहे, असं ट्वीट त्यांनी केलं होतं. आता हा कोणता आवाज असेल याचा खुलासा झाला आहे.

मनसेक़डून ३ मे रोजी 'भोंगा' नावाचा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, राज ठाकरे यांनी सातत्याने आपल्या भाषणांमधून भोंग्यांबद्दल भाष्य केलं आहे. राज ठाकरेंनी म्हटलं आहे की भोंगा हा धार्मिक मुद्दा नसून सामाजिक प्रश्न आहे. त्याच भोवती फिरणारा हा चित्रपट असणार आहे. या समस्येवर पूर्ण चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे. हा विचार सगळ्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने आम्ही हा चित्रपट ३ मे ला प्रदर्शित कऱण्याचं ठरवलं. हा चित्रपट २०१८ मध्ये तयार झाला होता. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरही उपलब्ध आहे.

'भोंगा' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजेता सिनेमा, फिल्मफेअर बेस्ट फिल्म क्रिटिक 2022, इंडिअन इंटरनॅशनल बेस्ट फिल्म, पुणे इंटरनॅशनल बेस्ट मराठी फिल्म, महाराष्ट्र स्टेट अवॉर्डमध्ये बेस्ट फिल्म, बेस्ट डिरेक्टर, सोशल फिल्म अँड स्टोरी हे पुरस्कार मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT