Raj Thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! विधानसभेला 'एकला चलो रे'चा नारा; २५० उमेदवार उभे करण्याची तयारी?

250 candidates of MNS for Legislative Assembly: राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभेत बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकला चलो रा चा नारा दिल्याची माहिती समोर आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभेत बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकला चलो रा चा नारा दिल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेसाठी मनसे २५० जागांची तयारी सुरू करणार असल्याची माहिती आहे. आज झालेल्या मनसेच्या अंतर्गत बैठकीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे स्वबळाची लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

येत्या १५ दिवसात मनसेचे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील परिस्थितीची चाचपणी करणार असल्याची माहिती आहे. जुलै महिन्यापर्यंत मनसे आपल्या उमेदवारांची यादी मनसेकडून फायनल केली जाणार असल्याची चर्चा आहे. या आधी २०१४ आणि २०१९ विधानसभेसाठी मनसेला भाजप आणि काँग्रेस आघाडीने टाळी दिली होती. मात्र, अखेरच्या क्षणी पाठिंबा न दिल्याने मनसेला मोठा फटका बसला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा निवडणुकीसाठी मनसेने चाचपणी सुरू केल्याचे चित्र आहे. यासंबधीचे वृत्त साम टिव्ही मराठीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. मनसेने विधानसभेसाठी २००-२५० जागांची तयारी सुरु केली आहे, अशी माहिती साम टिव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चाचपणी सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीत मनसे राज्यातील २५० जागांची चाचपणी करणार आहे. त्यामुळे मनसे पुन्हा 'एकला चलो रे' या भूमिकेत दिसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. मनसेच्या अंतर्गत बैठकीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंकडे स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली.

दरम्यान, या आधी २०१४ आणि २०१९ विधानसभेच्या निवडणुकीत मनसेला भाजप आणि काँग्रेस आघाडीने टाळी दिली होती. मात्र, अखेरच्या क्षणी पाठिंबा दिल्याने मनसेला मोठा फटका बसला. त्यामुळे या निवडणुकीत ती चूक पुन्हा मनसे करणार नसल्याचं बोललं जात आहे. मनसेने आज बैठक आयोजित केली होती यावेळी आगामी निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: जालन्यात शिंदेसेनेला मोठं भगदाड! सर्व तालुकाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, कार्यपद्धीवर नाराज

IND U19 vs PAK U19: सेहवाग-द्रविड स्वस्तात बाद, पण अर्जुन राजपूतचं खणखणीत शतक; भारताच्या पाकिस्तानविरुद्ध २०० धावा पार

Pimpri Chinchwad Water Cut : रावेतमध्ये नदीतून बेकायदा पाणीउपसा पाणीचोरीवर कारवाईचा बडगा; अनधिकृत यंत्रणा हटविण्याचे आदेश

Narak Chaturdashi 2026: नरक चतुर्दशीला कणकेच्या दिव्याने का ओवाळतात? जाणून घ्या ४ धार्मिक मान्यता

Latest Marathi News Live Update: श्रीनगरमध्ये सक्रिय असलेल्या चार वॉन्टेड दहशतवाद्यांचे फोटो जारी

SCROLL FOR NEXT