Raj Thackeray Balasaheb Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

'अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा!'

सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर मनसेच्या या सूचक ट्वीटने चर्चांना उधाण आलंय.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सध्या अभूतपूर्व राजकीय घडामोडी सुरू आहेत. शिवसेना कोणाची हा प्रश्न सध्या राज्याच्या राजकारणात ऐरणीवर आलाय. शिंदे ठाकरेंमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेवरुन चाललेल्या वादात आता राज ठाकरेंचीही उडी पडण्याची चर्चा सुरू झालीये. कारण ठरलंय मनसेकडून करण्यात आलेलं एक ट्वीट.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये संदीप देशपांडे म्हणतात, 'अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा!' यासोबत संदीप देशपांडेंनी राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा एक फोटोही शेअर केलाय. सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर हा फोटो फारच बोलका आहे.

या ट्वीटनंतर देशपांडे यांनी माध्यमांशी संवादही साधला ते म्हणाले,"बाळासाहेब ठाकरे यांचे विचार यांचे जो पुढे घेऊन जाईल, त्यालाच जनता आता मान्य करेल. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेत आहेत. राज्यातील जनतेची ही भावना आहे. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे विचार हे कोणाचीही प्रॉपर्टी नाही. व्यक्तीवर मालकी हक्क असू शकत नाही.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर फक्त प्रकाश आंबेडकर यांचाच हक्क आहे का?"

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना संदीप देशपांडे म्हणतात, " काँग्रेस सोबत तुम्ही गेलात, हा बाळासाहेबांचा विचार आहे का?बाळासाहेब हे सगळ्या महाराष्ट्राचे आहेत. कोणाचा काय लोचा आहे हे, हे सगळं राज्य बघतंय. शिवसेना फक्त बोलाची कडी आणि बोलाचा भात आहे. मराठी पाट्या, मशिदीवरील भोंगे हे बाळासाहेबांचे विचार होते ते आता राज ठाकरे पुढे नेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT