raj thackeray new home esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray | कसं आहे राज ठाकरेंचं नव घर ‘शिवतीर्थ’?

ज्योती देवरे

(रिपोर्ट - सुशांत सावंत)

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या (raj thackeray) नव्या घराची चर्चा सूरू आहे. मात्र आता चर्चेला पूर्णविराम मिळाला असून आज (ता.६) राज ठाकरे यांनी नव्या घरात प्रवेश करणार आहेत. राज ठाकरे यांचा गृहप्रवेश आणि नव्या घराचं नाव काय असेल, याचं सगळ्यांनाच कुतूहल होतं. या प्रश्नाचंही कोडंही आज उलगडलं असून आज भाऊबीजेच्या दिवशी राज ठाकरेंनी नव्या घरात प्रवेश केला आहे.

राज यांच्या नव्या घराचे नाव शिवतीर्थ असं ठेवण्यात आलं आहे… त्यामुळे राज यांचं शिवतीर्थ आतूनबाहेरून कसं आहे याबाबतची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. गृहप्रवेशासाठी वास्तूशास्त्र विशारद, पंचांग आणि तज्ञ जाणकार यांच्याकडून सल्ला घेऊनच मुहूर्त निवडण्यात आलाय. नव्या घराला एकूण ६ मजले आहेत. राज ठाकरेंच्या या नव्या घरात होम थिएटर आहे. या नव्या घराच्या उभारणीचे काम अंदाजे 2 ते 2.5 वर्षे सुरू होते. घराचा दर्शनी भाग शिवाजी पार्कच्या दिशेने आहे.

नव्या घराचं संपूर्ण डिझाईन राज यांनी स्वत: लक्ष घालून तयार करून घेतले आहे. घराचं झुंबरही त्यांनी स्वत: डिझाइन करून करून घेतले आहे. घराचं सगळं फर्निचर, वस्तू त्यांनी स्वत: डिझाईन केल्या आहेत. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित यांना मात्र त्यांनी त्यांची खोली त्यांच्या संकल्पनेनुसार तयार करण्याची मुभा दिली. मात्र संपूर्ण घराची मांडणी ही राज ठाकरे यांच्या नजरेतूनच झालीय

राज ठाकरे सध्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी राहतात. या निवासस्थानाच्या बाजूलाच असलेल्या नव्या बंगल्यात आता ते कुटुंबासह रहायला जाणार आहेत. ‘कृष्णकुंज’च्या आधी राज ठाकरे दादर शिवाजी पार्कातील ‘कदम मेन्शन’ या ठिकाणी कुटुंबीयांसोबत राहत होते. साधारणत 2000-2001 मध्ये राज ठाकरे आपल्या कुटुंबासोबत ‘कृष्णकुंज’या निवासस्थानी राहायला आले. ‘कृष्णकुंज’तील घर आधी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी घेण्याचं ठरवलं होतं, मात्र काही कारणास्तव त्यांनी ‘कृष्णकुंज’तील ते घर घेतलं नाही. त्याला काही कारणं होती. ‘कृष्णकुंज’ हे छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील घर कुणालाही त्याकाळी घेणं पसंत होतं. त्यामुळेच लता मंगेशकर यांनी तेव्हा राज ठाकरे यांना कृष्णकुंजमधील घर घेण्याचं सुचवलं होते, राज ठाकरे हे सुद्धा नवं घर घेण्याच्या विचारात होते आणि त्यांनी ते घर घेतलं. ‘कदम मेन्शन’मध्ये आधी राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे अशी दोन कुटंबं राहत होती. याच ‘कदम मेन्शन’मध्ये शिवसेनेची स्थापना झाली होती. तेव्हा दोन परिवार या घरात राहात होते. कालांतराने बाळासाहेब वांद्र्यातील ‘मातोश्री’त राहायला गेले. राज ठाकरे ‘कृष्णकुंज’ मध्ये राहायला गेल्यानंतर त्यांची बहीण जयजयवंती आपल्या कुटुंबासह तिथे राहत आहे.

नव्या घराचं संपूर्ण डिझाईन राज यांनी स्वत: लक्ष घालून तयार करून घेतलंय. उदाहरण द्यायचं झालं तर, घराचं झुंबरही त्यांनी स्वत: डिझाइन करून करून घेतलेत. घराचं सगळं फर्निचर, वस्तू त्यांनी स्वत: डिझाईन केल्या आहेत. काही फर्निचर मात्र परदेशातून तर काही इकडच्या कारागिरांकडून तयार करून घेतलंय. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित यांना मात्र त्यांनी त्यांची खोली त्यांच्या संकल्पनेनुसार तयार करण्याची मुभा दिली. मात्र संपूर्ण घराची मांडणी ही राज ठाकरे यांच्या नजरेतूनच झालीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT