Raj Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Women's Day 2023 : 'जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचाय, त्यासाठी..'; राज ठाकरेंची महिलासांठी खास पोस्ट

Raj Thackeray Fb Post: आज जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

International Women's Day 2023 : 'जागतिक महिला दिन' (International Women's Day) हा दिवस जागतिक स्तरावर दरवर्षी 8 मार्चला महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी साजरा केला जातो.

तसंच, लिंग समानतेचं महत्व पटवून देण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो. आज जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. फेसबुक पोस्टव्दारे त्यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या.

‘सर्वच क्षेत्रांत स्त्रियांची घौडदौड सुरु’

राज ठाकरे म्हणाले, ‘सगळ्या चौकटी मोडून आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु आहे, ती थक्क करणारी आहे. आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील, इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची, स्वतःच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. आणि त्यासाठी त्या घरापासून लांब इतर शहरांत किंवा परदेशांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्तानं सहज स्थिरावत आहेत. जिथं जातील तिथं स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे.’

‘शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून स्त्रियांना प्रचंड संघर्ष करावा लागला’

100, 150 वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून प्रचंड संघर्ष करावा लागत होता, अशी परिस्थिती होती. आणि त्याच समाजात मोठमोठ्या उद्योगसमूहांच्या व्यवस्थापनापासून ते जागतिक अर्थकारणात उलाढाली करणाऱ्या संस्थांमध्ये मोठ्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत. इतकंच काय देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचं संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आणि हे सर्व त्यांनी निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावलं आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

‘स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं’

ते पुढं म्हणाले, म्हणूनच स्त्रियांनी आता राजकारणात (Politics) देखील मोठ्या प्रमाणावर यायला हवं. 'जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं' हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं (Maharashtra Navnirman Sena) ध्येय आहे आणि हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, ह्याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच, विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे, असं सांगत राज ठाकरेंनी महिलाना राजकारणात येण्याची ऑफर दिली आहे. शेवटी त्यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT