Raj Thackeray Panvel 
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray Panvel: कॉन्ट्रॅक्टर पळून जातात, हे मुंबई-गोवा हायवेच्या बाबतीतच का घडलं?; राज ठाकरेंना शंका

Sandip Kapde

Raj Thackeray Panvel: राज ठाकरे यांनी मुंबई- गोवा महामार्गावरुन भाजपवर हल्लाबोल केला आहे. या महामार्गासाठी मनसेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनाला राज ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन यांच्याशी झालेला संवाद राज ठाकरे यांनी सांगितला.

राज ठाकरे म्हणाले, मुंबई गोवा महामार्गाबद्दल मी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींशी बोललो. गडकरी म्हणाले, मी लक्ष घातलं पण कंत्राटदार पळाले. काही लोक कोर्टात गेले आहेत. यामागे काय कारण आहे?. मुख्यमंत्री म्हणतात, महामार्ग पूर्ण होईल पण मृत्यूमुखी पडलेल्यांच कायं? अडीच हजार लोक गेली त्यांच काय? अपघात होतात… टायर फुटतात… पण सगळ काही ढीम्म.

मुंबई गोवा महामार्गावर आजपर्यंत २५०० लोकं मृत्यूमुखी पडलेत. अनेकांना दुखणी लागली आहेत, गाड्यांचं नुकसान झालं आहे. तरीही त्याच लोकांना निवडून देत आहेत. त्यामुळे हे पुन्हा पुन्हा निवडून येणारे निवांत आहेत. ते टेंडर, टक्केवारीत व्यस्त आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.  

आत्तापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खर्च झालेला पैसा १५६६६ कोटी रुपये आहे. तरीही रस्ता झाला नाही. फक्त काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्या. मी नितीनजींना विनंती केली होती की जर राज्य सरकारला जमत नसेल तर तुम्ही बघा, तर ते म्हणाले की अहो कॉन्ट्रॅक्टर पळून जातात. हे नेमकं मुंबई गोवा हायवेच्या बाबतीतच का घडलं? कोकणाचा विकास होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतंय का?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. (latest marathi news)

राज ठाकरे म्हणाले, २०२४ ला मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल असं आता सरकार सांगतंय. चांगलंच आहे, हे व्हायलाच हवं. पण पुढे काय? मुंबई-पुणे रस्ता झाला, आणि पुणे पसरत गेलं. घडलं काय तर पुण्याची पार वाट लागली. पुण्यात मराठी माणूस हा आक्रसत चालला आहे. हेच कोकणात होणार आहे.

गोव्यात २०२३ चा कायदा आहे की तुम्हाला सहज शेतजमीन घेता येणार नाही. आणि जर घेतली तर तिकडे शेतीच करावी लागली, तिथे इतर उद्योग, हॉटेलं उभारता येणार नाही. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गोव्याचा आम्ही गुरुग्राम होऊ देणार नाही, थोडक्यात उत्तर भारतीयांना जमिनी घेऊन गोव्याची वाट लावू देणार नाही. आणि हे बोलणारा कोण तर भाजपचा मुख्यमंत्री, असे राज ठाकरे म्हणाले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT