raj thackeray nashik Sakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray: 'तुम्ही मला मतदान करत नाही'...अन् राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले

सुरत-चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

धनश्री ओतारी

सुरत-चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी तुम्ही मला मतदान करत नाही, मग अडचणींच्यावेळी माझ्याकडे का येत? असे अनेक संतप्त सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले. ?(Raj Thackeray question to the farmers)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज नाशिकमधल्या काही शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली आणि आपल्या अडचणी सांगितल्या. यावेळी राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना उलट सवाल उपस्थित केले.

काय म्हणाले राज ठाकरे?

मध्यंतरी शेतकऱ्यांनी संप केला होता. तेव्हा काही शेतकरी बांधव मला भेटायला आले होते. मी त्यांना सांगितलं, अडचणींच्या काळात माझ्याकडे येता आणि मतदानाच्या वेळी मतदान त्यांना करता. त्यावेळी मला शेतकरी बांधव म्हणाले, साहेब अडचण वेगळी आणि मतदान वेगळं.

जे तुम्हाला मदत करत नाही त्यांना तुम्ही मतदान करत आलात तर अडचणींच्या काळात तुम्ही माझ्याकडे का येता? ज्यांनी सांगितलं होतं की, आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करतो त्यांना तुम्ही मतदान केलंत की नाही? असे सवाल उपस्थित करत आपण काय करतो आहोत त्याचं भान ठेवा. अस राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं.

तसेच, निवडणुकीच्या काळात पैसे घेऊन बाकी सगळ्या गोष्टी घेऊन कुणाला मतदान करता? मग पाच वर्षे त्यांच्या नावाने टाहो फोडता आणि परत निवडणुका आल्यावर त्यांनाच मतदान करता. मग कशासाठी हा खेळ खेळत आहात? मी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटतो. मात्र काय करतो आहोत त्याचं भान ठेवा.

कारण तुम्ही मतदान त्यांना करता त्यामुळे त्यांना वाटतं की, हे मतदान आपल्यालाच करणार आहेत. त्यांना काही फरकच पडत नाही.” असं म्हणत राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Transport: महाराष्ट्रात बेकायदेशीर वाहतुकीवर सर्जिकल स्ट्राईक! राज्यव्यापी धडक मोहीम सुरू; अंमलबजावणी कधीपासून?

टॉपची कलाकार आणि कोट्यवधींची कमाई असूनही भाड्याच्या घरात राहते ही अभिनेत्री ; महिन्याचं भाडं वाचून बसेल धक्का !

Protein Benefits: फक्त बॉडीसाठी नव्हे, तर दैनंदिन आरोग्य टिकवण्यासाठीही प्रोटीन अत्यंत गरजेचं! जाणून घ्या कारणे

Horscope : उद्यापासून धनदौलत योग! 'या' 5 राशींचा सुवर्णकाळ सुरू; नोकरी-व्यवसायात मोठी संधी, अडकलेल्या कामात मिळेल नशिबाची साथ

फी न भरल्याने आठवीतील विद्यार्थ्याला परीक्षेस मज्जाव, शाळेच्या कारवाईविरोधात कडक पाऊल उचलण्याचा इशारा, पनवेलमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT